मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यसभेसाठी भाजपने रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला आहे. (BJP Maharashtra Rajya Sabha Election Candidate 2026)
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 7 जागांपैकी भाजपने आपल्या वाट्याला आलेल्या ४ जागांवरती उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून रामदास आठवले (Ramdas Athawale), विनोद तावडे (Vinod Tawde), माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate ) आणि रामराव वडकुते (Ramrao Wadkute) यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. तर शिवसेना १, राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा निवडून येईल तर महाविकास आघाडीकडे १ जागा आहे.
भाजपने राज्यसभेवर यावेळी दिलेल्या उमेदवारांमध्ये दोन नावं नवीन आहे, यामध्ये असलेले रामराव वडकुते हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक ज्येष्ठ राजकारणी आणि विधान परिषदेचे माजी आमदार आहेत.
रामराव वडकुते यांचा परिचय
रामराव वडकुते हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक ज्येष्ठ राजकारणी आणि विधान परिषदेचे माजी आमदार आहेत.
त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
राजकीय कारकीर्द: ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते होते आणि त्यांनी पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.
पक्षप्रवेश: ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला .
हिंगोली जिल्हाध्यक्ष: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, २०२१ मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महत्त्वाची पदे: त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
सामाजिक पार्श्वभूमी: ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात .
पक्षातील सगळे नेते मंडळी या सर्वांचा आभारी आहे
रामराव वडकुते यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, मला मनापासून आनंद झाला आहे, कारण भाजपने माझ्यावर जो हा मोठा विश्वास दाखवला आहे, जनतेमध्ये काम करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस तसंच पक्षातील सगळे नेते मंडळी या सर्वांचा आभारी आहे, माझ्यासारख्या ज्याच्या कुटुंबात ग्रामपंचायत सदस्य देखील नाही, त्याला देशातील उच्च पातळीवर काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, आज माझं मन भरून आलं आहे, अशाप्रकारे गरीब माणसाला सुद्धा भाजप चांगली संधी देते, त्यांच्या कामाची पावती म्हणून देते आणि समाजाचा छोटा घटक, समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं, त्यामुळे मी सर्व पक्षश्रेष्ठींना धन्यवाद देतो, असंही पुढे वडकुतेंनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीने मला आमदार केलं होतं, परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, मी माळकरी आहे, पवार साहेबांनी सुद्धा मला बरंच काही दिलं, परंतु ज्या वेळेस हिंदुत्वाची लाट तयार झाली आणि मोदी पंतप्रधान झाले आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले ते मी जवळून पाहिले, त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिली होती मोदींचं देशामधलं जे काम होतं, प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आपण हे त्यांचे धोरण मला आवडलेलं होतं, त्या धोरणासाठी माझ्या अकरा महिन्याच्या आमदारकीचा तयार करून त्या धोरणाला सलाम म्हणून मी तो निर्णय घेतला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आम्हाला सातत्याने प्रत्येक घटकापर्यंत आपण गेले पाहिजे सर्व जाती धर्माला घेऊन आपण चाललं पाहिजे ही आम्हाला शिकवण देत होते, हे सगळं बघून मी माझ्या पक्षाचा त्याग करून कुठलीही अपेक्षा न करता भाजपमध्ये आलो, अहिल्यादेवींच्या विचाराने मी प्रेरित आहे, असेही पुढे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा