अबुराव : किती सफाई देताय. अशी लस असते काय? कोणाला गंडवता? मला द्या बघू ती लस. दूध का दूध, लस की लस्सी. होऊनच जाऊदे. सांगा कुठे घ्यावी लागते दंडावर की..?
गब्बुराव : हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाख रुपये. विचार करा. वहिनींना विचारा एकदा. सांगून बघा दोन लाखांवर पाणी सोडलं. लस कशी घ्यायची त्याच सांगतील.
अबुराव : तुमची वहिनी म्हणजे माझी बायको खात्यात माझी वरिष्ठ आहे. आपली ही लस तिच्या कानावर घालतो. घ्या म्हटली तर उत्तम नाही म्हटली तर ती लस तुम्ही कुठे घेणार याचा आत्ताच विचार करून ठेवा.
गब्बुराव : ऑ! साहेब ते बिचार्या बाबुरावला वाचवण्यासाठी मी बोललो. माझं त्यात काही नाही. घेऊन जा त्याला.
अबुराव : आम्ही घेऊन जातो त्याला पण आमच्या दोन लसी तयार ठेवा. तुमचं नाव खोडतो. हा हा हा…
गब्बुराव : लयच डोक्याचं दही करता राव! या तयार आहेत लसी. घेऊन जा. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल!