Wednesday, February 25, 2026
HomeNewsMartahiT20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७...

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

  • भारताचा नेदरलँड्सवर 17 धावांनी विजय

  • टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सलग चौथा विजय

  • शिवम दुबेची अष्टपैलू कामगिरी – 66 धावा, 2 विकेट

टी-२० विश्वचषक स्पर्धेत अ गटातील सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवलाय. भारताने अ गटातील चार सामने जिंकलेत. आजच्या सामन्यात ६६ धावा आणि दोन विकेट्स घेणाऱ्या शिवम दुबेला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियानं ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. यजमान संघाने तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्मा बाद झाला.

त्यानंतर तिलक वर्माने डाव सावरला. त्याने ईशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत ३० धावांची भागीदारी केली. दरम्यान भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सने त्यांच्या निर्धारित षटकांत ७ बाद १७६ धावा केल्या. मायकेल लेविट आणि मॅक्स ओ’डॉड यांनी संघाला स्थिर सुरुवात दिली.दोन्ही खेळाडूंनी ५.४ षटकांत ३५ धावा जोडल्या. ओ’डॉडने २० धावा केल्या, तर लेविटने २४ धावा दिल्या.

तिलकनं २७ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला, त्यानंतर कर्णधार सूर्याने शिवम दुबेसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावा जोडून संघाला ११० धावांपर्यंत पोहोचवले. संघाच्या एकूण धावसंख्येत ३४ धावांचे योगदान देऊन सूर्या पॅव्हेलियनमध्ये परतला. तेथून शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूत ७६ धावांची भागीदारी करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दुबेने ३१ चेंडूत ६६ धावा केल्या. यात सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता, तर हार्दिक पंड्याने २१ चेंडूत ३० धावा केल्या.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring