Friday, March 6, 2026
HomeTechnologySavlyachi Janu Savali New Entry: Mansi Suresh from Shiva Serial

Savlyachi Janu Savali New Entry: Mansi Suresh from Shiva Serial

Savlyachi Janu Savali New Entry: तुम्हाला ‘शिवा’ मालिका आठवतेय? झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित झाली होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेने ऑगस्ट २०२५ मध्ये निरोप घेतला. मालिकेतील शिवा, आशू, कीर्ती, दिव्या, रामभाऊ, बाईआजी ही आणि अशी सगळीच पात्रे गाजली.

शिवाने तिच्या अनोख्या स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र, आता या मालिकेची का चर्चा होत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? तर या मालिकेतील एका अभिनेत्रीची झी मराठीच्या सावळ्याची जणू सावली मालिकेत एन्ट्री झाली आहे. आता ही अभिनेत्री नेमकी कोण, हे जाणून घेऊ…

सावळ्याची जणू सावली या मालिकेत दररोज नवीन ट्विस्ट येताना दिसतात. सावली आणि भैरवी सतत एकमेकींना आव्हान देतात. भैरवी ही सावली व मेहेंदळे कुटुंबाला त्रास देण्यासाठी त्यांच्या घरात आली आहे. ती सावलीविरुद्ध कारस्थान करते. कधी सावलीला त्याचा त्रास होतो; तर कधी सावली भैरवीच्या कारस्थानांना सामोरी जाते आणि तिला धडा शिकवते.

हेही वाचा

“मी तुझंही दहन करणार…”

आता सावळ्याची जणू सावली मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, मेहेंदळे कुटुंब होळी साजरी करत आहे. भैरवीदेखील तिथे आहे. सावली, तारा आणि घरातील इतर मंडळी होळीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यावेळी भैरवी मनातल्या मनात सावलीकडे बघत म्हणते, “या होलिकादहनाबरोबर मी तुझंही दहन करणार”, असे म्हणत ती सावलीला धक्का देते. सावलीचा धक्का तिच्या पुढे असलेल्या ताराला लागतो. ताराला अग्नीचे चटके बसतात; पण सावली तिला सावरते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सावली भैरवीला म्हणते, “माझा जीव गेला असता.” त्यावर भैरवी म्हणते, “एक दिवस तुला आणि तुझ्या घराला असंच होळीच्या आगीत जाळेन.” त्यावर सावली म्हणते, “माझ्या घरच्यांना काही करण्यापूर्वी तुम्हाला मला पार करावे लागेल.” त्यावर भैरवी तिला म्हणते, “बघूया, भैरवी वझेपासून तुझ्या घराला कशी वाचवतेस?”, असे म्हणत ती तिच्या हातातील कलश फेकून देते. तो कलश एका मुलीच्या पायाशी पडतो. ती मुलगी भैरवीला, भैरवीमाई… अशी हाक मारते. त्यानंतर भैरवी व सावली तिच्याकडे बघतात.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘यंदा होळीत भैरवीच्या गर्वाचे दहन होईल का?’, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा

आता भैरवीला हाक मारणारी ही मुलगी म्हणजे अभिनेत्री मानसी सुरेश आहे. शिवा मालिकेत तिने कीर्ती ही भूमिका साकारली होती. शिवाला सतत त्रास देणारी, स्वार्थी व्यक्ती, अशी तिची भूमिका होती. आता सावळ्याची जणू सावली या मालिकेत तिचे पात्र नेमके कसे असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments