Sant Tukaram Beej Quotes In Marathi: संत तुकाराम महाराजांना बीजनिमित्त ‘हे’ संदेश शेअर करून करा अभिवादन!
Sant Tukaram maharaj Beej Quotes In Marathi: संत तुकाराम महाराज बीज हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक सोहळा मानला जातो. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी देहू येथून वैकुंठगमन केले अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे तुकोबांच्या स्मरणार्थ दरवर्षी या दिवशी देहू आणि महाराष्ट्रभर कीर्तन, भजन, अभंगगायन आणि पालखी सोहळ्यांचे आयोजन केले जाते. तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून समाजाला भक्ती, नैतिकता आणि समतेचा संदेश दिला. “विठ्ठल-रखुमाई” भक्तीचा अखंड जप करत त्यांनी वारकरी परंपरेला नवी दिशा दिली. त्यांच्या बीज दिनानिमित्त भक्तगण देहू येथे एकत्र येऊन अभंग पठण आणि नामस्मरणातून कृतज्ञता व्यक्त करतात. यानिमित्ताने येथे दिलेले कोट्स शेअर करून करा तुकोबांना अभिवादन…
आम्ही जातो आपुल्या गावा
आमचा रामराम घ्यावा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज
यांना बीजनिमित कोटी कोटी वंदन!
———————————–
दया, क्षमा, शांती…
तेथेची देवाची वस्ती
संत तुकाराम महाराज यांना
बीजनिमित कोटी कोटी नमन!

शब्दां मुळे दंगल, शब्दां मुळे मंगल
शब्दांचे हे जंगल, जागृत राहावं
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
———————————–
जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन
भगवंत जाण त्याचेजवळी
संत तुकाराम महाराज यांना
बीजनिमित कोटी कोटी नमन!

लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
संत तुकाराम महाराज यांना
बीजनिमित्त विनम्र अभिवादन!
———————————–
अज्ञानाच्या पोटी,
अवघीच फजिती
संत तुकाराम महाराज यांना
बीजनिमित्त विनम्र अभिवादन!

जे का रंजले गांजले
त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
संत तुकाराम महाराज यांना
बीजनिमित विनम्र अभिवादन!
हे ही वाचा…
———————————–
साधु-संत येती घरा
तोचि दिवाळी दसरा
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना
बीज निमित्त विनम्र अभिवादन!
———————————–
सुख पाहता जवापाडे
दुःख पर्वताएवढे
संत तुकाराम महाराज यांना
बीजनिमित विनम्र अभिवादन!

आम्ही वैकुंठवासी, आलो याचि कारणासी
बोलिले जे ऋषि, साच भावे वर्ताया
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना
बीज निमित्त विनम्र अभिवादन!
हे ही वाचा…
———————————–
दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये,
उलट पद्धतशीरपणे अवमान करावा
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!