Thursday, March 19, 2026
HomeNewsMartahiRohit Shetty: बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी रोहित शेट्टीच्या घरी झाडल्या गोळ्या, तपासात...

Rohit Shetty: बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी रोहित शेट्टीच्या घरी झाडल्या गोळ्या, तपासात धक्कादायक खुलासा | Rohit Shetty New revelations within the firing incident at Rohit Shetty home Shots have been fired to repay debt for Accused sister marriage ceremony

गोळीबारातील मुख्य आरोपी दीपक शर्माला दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी दीपकची धाकटी बहीणचं लग्न झालं होतं आणि त्याच्या कुटुंबाने त्यांचे घर गहाण ठेवले होते आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतले होते. पण, तिच्या आजारपणामुळे तिच्या सासरच्यांनी तिला सोडून दिले. परिणामी, तिच्या बहिणीची जबाबदारी दीपकच्या खांद्यावर आली. पैशांची गरज असल्याने दीपकने गुन्हेगारीचा पर्याय निवडला आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी दीपक घाबरला होता, म्हणून त्याने दारू विकत घेतली आणि नंतर गोळीबार केला. पोलिस चौकशीत असेही उघड झाले की दीपकला गोळीबार करण्यासाठी ३ लाख देण्याचे आश्वासन देण्यात आले होते आणि त्याचे तीन साथीदारही त्यात सामील होते. इतकेच नाही तर यासाठी त्याला ५०,००० रुपये अॅडवान्स देण्यात आला होता.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments