




Price: ₹470 - ₹345.46
(as of Mar 17, 2026 16:41:43 UTC – Details)
पुन्हा कधीही शब्दांची कमतरता भासू देऊ नका! तुम्हाला कधी अशा यशस्वी लोकांचे कौतुक वाटले आहे का, ज्यांचे आयुष्य अगदी सुफळ-संपन्न आहे असे वाटते? तुम्ही अशा लोकांना पार्ट्यांमध्ये व बिझनेस मीटिंग्जमध्ये आत्मविश्वासाने बोलताना पाहता. अशा लोकांकडे सर्वोत्तम नोकर्या, उत्तम जोडीदार व चांगले मित्र असतात. हे लोक काही तुमच्यापेक्षा जास्त हुशार किंवा दिसायला अधिक देखणे असतात असे नाही. मग त्यांच्या यशाचे रहस्य काय असते? त्यांच्याकडे लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य असते. ‘हाउ टू टॉक टू एनीवन’ या बेस्टसेलिंग पुस्तकात जागतिक स्तरावरील अव्वल लेखिका आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लाइफ कोच लायल लाउंड्स यांनी यशस्वी संवादाची रहस्ये आणि मानसशास्त्र उलगडले आहे. या साध्यासोप्या व प्रभावी अशा 92 तंत्रांद्वारे तुम्ही पुढील कौशल्ये आत्मसात करू शकता : एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणे पार्टीवर पकड कशी मिळवावी? कोणत्याही समूहात आतल्या गोटातील व्यक्ती कसे व्हावे? संवादाला सुयोग्य दिशा देण्यासाठी शब्दांचा आणि वाक्प्रचारांचा वापर कसा करावा? समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी देहबोलीचा वापर कसा करावा? या पुस्तकाचा सुबोध व ओघवता मराठी अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी. कोणत्याही प्रसंगी यशस्वी संवाद कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करणारे पुस्तक.
From the Publisher
How to Talk to Anyone: 92 Little Tricks for Big Success in Relationships


पुन्हा कधीही शब्दांची कमतरता भासू देऊ नका!
तुम्हाला कधी अशा यशस्वी लोकांचे कौतुक वाटले आहे का, ज्यांचे आयुष्य अगदी सुफळ-संपन्न आहे असे वाटते? तुम्ही अशा लोकांना पार्ट्यांमध्ये व बिझनेस मीटिंग्जमध्ये आत्मविश्वासाने बोलताना पाहता. अशा लोकांकडे सर्वोत्तम नोकर्या, उत्तम जोडीदार व चांगले मित्र असतात.
हे लोक काही तुमच्यापेक्षा जास्त हुशार किंवा दिसायला अधिक देखणे असतात असे नाही. मग त्यांच्या यशाचे रहस्य काय असते? त्यांच्याकडे लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य असते.
‘हाउ टू टॉक टू एनीवन’ या बेस्टसेलिंग पुस्तकात जागतिक स्तरावरील अव्वल लेखिका आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लाइफ कोच लायल लाउंड्स यांनी यशस्वी संवादाची रहस्ये आणि मानसशास्त्र उलगडले आहे. या साध्यासोप्या व प्रभावी अशा 92 तंत्रांद्वारे तुम्ही पुढील कौशल्ये आत्मसात करू शकता:
एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणे पार्टीवर पकड कशी मिळवावी?
कोणत्याही समूहात आतल्या गोटातील व्यक्ती कसे व्हावे?
संवादाला सुयोग्य दिशा देण्यासाठी शब्दांचा आणि वाक्प्रचारांचा वापर कसा करावा?
समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी देहबोलीचा वापर कसा करावा?
या पुस्तकाचा सुबोध व ओघवता मराठी अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी. कोणत्याही प्रसंगी यशस्वी संवाद कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करणारे पुस्तक.


तुम्हाला कधी अशा यशस्वी लोकांचे कौतुक वाटले आहे का, ज्यांचे आयुष्य वरवर पाहता अगदी सुफळ संपन्न आहे. तुम्ही या लोकांना बिझनेस मीटिंग्जमध्ये आत्मविश्वासाने बोलताना पाहता, पार्ट्यांमध्ये सहजपणे वावरताना पाहता. त्यांच्याकडे सर्वोत्तम नोकर्या असतात, उत्तम जोडीदार असतात, चांगले मित्र असतात, गब्बर बँक खाती असतात आणि अत्यंत फॅशनेबल पिनकोड्सही असतात.
पण जरा थांबा! अशा लोकांपैकी बहुतेकजण काही तुमच्यापेक्षा जास्त हुशार नसतात. ते तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलेही नसतात आणि तुमच्यापेक्षा जास्त देखणेही नसतात!
त्यांच्या या यशाला कारणीभूत असते ती इतरांशी वागण्याची पद्धत… अधिक कुशल पद्धत.
लक्षात घ्या, कुणीही एकट्याने शिखरावर पोहोचत नाही. ज्या लोकांचे आयुष्य ‘सुफळ संपन्न’ दिसते त्यांनी आजवर त्या हजारो जणांच्या हृदयात स्थान मिळवले आहे व त्यांची मने जिंकली आहेत, ज्यांनी त्यांना टप्प्याटप्प्याने शिखरापर्यंत जाण्यास मदत केली आहे. मग ती शिडी कॉर्पोरेट असो वा सामाजिक क्षेत्रातील.
अर्थात आज जे जुने लोक (तितकेही जुने नव्हे) – आपला देश, आपल्या संस्था, मंडळे आणि आपल्या कला यांसाठी योगदान देतात, तो नक्कीच ‘अपघात’ किंवा ‘योगायोग’ नसतो. या सगळ्या लोकांकडे आहेत युक्त्याप्रयुक्त्या, जादूची पोतडी आणि असा परीसस्पर्श ज्यामुळे ते जे काही करतात ते यशस्वी होते.
त्यांच्या या पोतडीत काय असते?
त्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सापडतील. त्यामध्ये मैत्रीचे धागे घट्ट विणणारी सामग्री असते. लोकांची मने जिंकून घेणारी विशिष्ट कौशल्ये असतात आणि एक अशी जादू असते, ज्यामुळे लोक त्यांच्या प्रेमात पडतात. त्यांच्याकडे असे गुणवैशिष्ट्य असते ज्यामुळे बॉस मंडळी त्यांना कामावर नेमतात आणि त्यानंतर त्यांना बढतीही देतात. त्यांच्याकडे असे गुणवैशिष्ट्य असते ज्यामुळे त्यांचे ग्राहक परतपरत त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्याकडे अशी मौल्यवान गोष्ट असते ज्यामुळे ग्राहक त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडून नव्हे तर त्यांच्याकडूनच खरेदी करतात.
आपल्या सर्वांच्या पोतडीत यापैकी काही युक्त्या असतातच, काही युक्त्या इतरांपेक्षा जास्तच असतात. ज्यांच्याकडे त्याचा संपूर्ण संग्रह असतो ते लोक आयुष्यात खूप मोठे होतात… बिग विनर्स. ‘हाउ टू टॉक टू एनीवन’ या पुस्तकात तुम्हाला अशा ‘बिग विनर्स’नी उपयोगात आणलेल्या ब्याण्णव छोट्या छोट्या युक्त्या समजतील, ज्यायोगे तुम्हीही आयुष्याचा डाव परिपूर्णरीत्या खेळू शकाल आणि आयुष्यात तुम्हाला जे हवे ते मिळवू शकाल.
लक्षात ठेवा, एखादी कृती पुन:पुन्हा करण्याने सवय लागते
तुमच्या सवयीतून तुमचे व्यक्तित्व घडते आणि
तुमचे व्यक्तित्व हेच तुमचे नशीब असते.
How to Win Friends and Influence People


हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’ हे डेल कार्नेगी यांचे व्यक्तिमत्त्वविकासासाठीचे अत्यंत लोकप्रिय पुस्तक असून जगभरात त्याच्या आजवर लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. खालील १२ प्रकारे हे पुस्तक मदतगार ठरू शकते.
चाकोरीबद्ध मनाला उभारी देणारे नवीन विचार, आकांक्षा आणि नवीन दृष्टिकोन बहाल करते.सरळसाध्या रीतीने, लवकरात लवकर मित्र कसे मिळवावेत यासाठी मार्गदर्शन करते.लोकप्रियता वाढवण्यासाठी मदत करते.तुमची विचारपद्धती इतरांना पटवून, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रेरक ठरते.कामे हातोहात होण्यासाठी तुमची क्षमता, प्रभाव आणि तुमची प्रतिष्ठा वाढवते.नवीन ग्राहकवर्ग आकर्षित करून घेण्यासाठी मदत करते.तुमची पैसा कमावण्याची पात्रता वाढवते.एक चांगला विक्रेता, एक चांगला व्यवस्थापक तयार करते.तक्रार निवारण करणे, कडवे वाद टाळणे आणि तुमचे मानवी संबंध मृदू व आल्हाददायक राखण्यास मदत करते.चांगला वक्ता, मनोज्ञ संभाषणपटू होण्याचा मार्ग दाखवते.तुमच्या दैनंदिन जीवनात मानसशास्त्रीय तत्त्वांचा अंतर्भाव सहजसोप्या पद्धतीने कसा करायचा ते शिकवते.तुमच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे गुपित सांगते.


‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांच्या साहित्यकृतींची सर्वाधिक विक्रमी विक्री होते असे लोकप्रिय लेखक डेल कार्नेगी यांनी या पुस्तकात तुमच्या- आमच्या जीवनाला मानसिक दौर्बल्यातून मुक्त करून अधिक यशस्वी व सफल बनवण्याचे प्रत्यक्ष तंत्र त्यांच्या अत्यंत चैतन्यमय आणि संवादात्मक शैलीत प्रस्तुत केले आहे. हा एक अत्यंत उत्कृष्ट व अद्वितीय ग्रंथ आहे. ‘’
– टाइम्स
“या पुस्तकाने संपूर्ण जगातील लोकांसाठी स्वयंसुधारणेचा आणि आत्मोन्नतीचा जणू एक कृति आराखडाच जन्माला घातलेला आहे.”
– डेली एक्स्प्रेस
लोकांना हाताळणे, त्यांच्याशी योग्य व्यवहार करणे ही बहुधा खूप मोठी समस्या आहे. विशेषत: अशा लोकांसाठी जे व्यावसायिक आहेत… आणि हो, तुम्ही गृहिणी असाल, व्यावसायिक असाल किंवा अभियंता असाल तरीसुद्धा हे तुमच्या बाबतीतही सत्य आहे. लोकांना कसे हाताळायचे ही मोठीच समस्या आहे. काही वर्षांपूर्वी ‘कार्नेगी फाउंडेशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ टीचिंग’च्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संशोधनातून स्पष्ट झालेली ही एक अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती थोड्या दिवसानंतर कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये करण्यात आलेल्या अतिरिक्त अभ्यासातून अधोरेखित झाली. तिथे झालेल्या त्या संशोधनातून हे स्पष्ट झाले की, इंजिनिअरिंगसारख्या तांत्रिक क्षेत्रातही आर्थिक यश हे एखाद्याच्या तांत्रिक ज्ञानावर केवळ 15 टक्के अवलंबून असते, तर याउलट त्याचे 85 टक्के आर्थिक यश हे त्याच्या मानवी अभियंतेगिरीमुळे म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि लोकांना हाताळण्याच्या कौशल्यामुळे आणि नेतृत्व गुणामुळे मिळालेले असते.
हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध प्राध्यापक विल्यम जेम्स यांनी असे म्हटले आहे की, ‘‘आपण जेवढे जागृत असायला हवे, त्याच्या 50 टक्केदेखील आपण जागृत नसतो. आपणाकडे असणार्या शारीरिक आणि मानसिक साधनसामग्रीचा केवळ निम्माच भाग आपण उपयोगात आणत असतो. अधिक स्पष्टपणे सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की, मानव हा त्याच्या मर्यादांच्या खूपच आत जगत असतो.’’ त्याच्याकडे अनेक प्रकारची क्षमता, शक्ती असते. पण त्या क्षमतेचा आणि शक्तीचा उपयोग करून घेण्यात तो यशस्वी होत नाही. त्या क्षमतांचा शोध घेणे, विकास करणे आणि या सुप्त अवस्थेतील न वापरल्या गेलेल्या क्षमता वापरण्याचे तंत्र विकसित करणे हे सर्व या पुस्तक लेखनाचे मुख्य हेतू आहेत.
हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो, ‘‘शिक्षणाचा मुख्य उद्देश माणसाला ज्ञानी बनवणे हा नाही तर त्याला कृतिशील बनवणे हा आहे’’ आणि हे पुस्तक प्रामुख्याने कृतिप्रधान पुस्तक आहे.
ASIN : B0BMPY4C7X
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd
Publication date : 1 January 2022
Language : Marathi
Print size : 704 pages
Reading age : 15 years and up
Item Weight : 610 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm