Monday, March 9, 2026
HomeBusiness​​​​​​​Heatwave Alert: महाराष्ट्र होरपळणार! मुंबई-ठाण्यासह कोकणात 'तीव्र उष्णतेची लाट'; विदर्भातही पारा चढणार,...

​​​​​​​Heatwave Alert: महाराष्ट्र होरपळणार! मुंबई-ठाण्यासह कोकणात ‘तीव्र उष्णतेची लाट’; विदर्भातही पारा चढणार, तर ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा इशारा Maharashtra Marathi News | Maharashtra Heat Wave Alert: maharashtra warmth wave alert mumbai thane akola imd climate forecast marathi

मुंबई: राज्यात उन्हाचा कडाका आता असह्य होऊ लागला आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी ‘तीव्र उष्णतेच्या लाटेचा’ इशारा जारी केला असून ९ आणि १० मार्च हे दोन दिवस अत्यंत कठीण राहण्याची शक्यता आहे. एकीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमट हवामानामुळे नागरिक हैराण होणार असतानाच, सिंधुदूर्ग, कोल्हापूर-सांगली भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ९ मार्च रोजी ‘उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट’ येण्याची ५१ ते ७५% शक्यता आहे. १० मार्च रोजी देखील या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण विभाग: तीव्र उष्णतेचा इशारा 

पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड: या जिल्ह्यांत ९ मार्च रोजी ‘तीव्र उष्णतेची लाट’ येण्याची शक्यता आहे. १० मार्च रोजी देखील येथे उष्णतेची लाट कायम राहील.
रत्नागिरी: येथे ९ आणि १० मार्च रोजी हवामान अत्यंत उष्ण आणि दमट असेल. 
सिंधुदुर्ग: ९ मार्च रोजी येथे हलक्या पावसाची शक्यता असून त्यानंतर हवामान कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र: उष्ण आणि दमट हवामान

धुळे आणि नंदुरबार: ९ मार्च रोजी येथे उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव: ९ आणि १० मार्च अशा दोन्ही दिवशी येथे उष्ण आणि दमट हवामान असेल.
नाशिक: ९ मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे.

विदर्भ: उष्णतेची लाट 

अकोला: ९, १० आणि ११ मार्च असे सलग तीन दिवस येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
अमरावती: ९ आणि १० मार्च रोजी येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
वर्धा: १० आणि ११ मार्च रोजी या जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर: या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काय इशारा…

छत्रपती संभाजीनगर, जालना: येथे ९ आणि १० मार्च रोजी हवामान उष्ण आणि दमट राहील.
परभणी, बीड, हिंगोली: १० आणि ११ मार्च रोजी या भागात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे.
अहिल्यानगर (अहमदनगर): १० मार्च रोजी येथे उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
लातूर: ११ मार्च रोजी येथे हवामान उष्ण आणि दमट राहील.

पुणे, धाराशिव, नांदेड: या जिल्ह्यांत पुढील ५ दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे असेल, कोणताही विशेष इशारा नाही.

पाऊस आणि गडगडाट 

कोल्हापूर, सातारा आणि सांगली: या जिल्ह्यांत ९ मार्च रोजी हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments