Holi Marathi Shubhechha Shimga Shubhechha : होलिका दहन किंवा होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक एकत्र येऊन अग्नीसमोर प्रार्थना करतात आणि मनातील नकारात्मकता, राग व मतभेद दूर करण्याचा संकल्प करतात. पुरण पोळी आणि गोडाधोडाचा नैवद्य होलिका मातेला अर्पण करून सकारात्मकता आयुष्यात येण्यासाठी प्रार्थना करतात. हा सण आपल्याला विश्वास, धैर्याची आठवण करून देतो. अशा या शुभ दिनी आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना मराठीतून शुभेच्छा, संदेश पाठवून सर्व त्रास होळीमध्ये दहन होण्याची प्रार्थना करा.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाईट सारे जळून जावे
चांगले ते उदयास यावे
दृष्ट प्रवृत्तींचा होवो नाश
सर्वांना लाभो सुख: शांती खास
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होलिका दहनाच्या शुभेच्छा
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांती नांदो.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
साजरा करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
होलिका दहनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्या
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठू दे मनी तरंग
तोडूनी बंध सारे,
असे उधळूया आज हे रंग…
होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्या.
वाईटाला अग्नीमध्ये दहन करूया
होळी सण रंगाचा
राग, द्वेष विसरून एकत्र येण्याचा
वाईटाला अग्नीमध्ये दहन करून
चांगल्या संकल्पना रूजवण्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आपल्या माणसांची साथ
पंगतीला पुरणपोळीचा थाट
होळीच्या अग्नीत नकारात्मकतेचा होणार नाश
पुन्हा नव्याने होऊदेत तुमच्या आयुष्याची सुरुवात
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी होळी
कटाची आमटी, पुरणाच्या पोळीवर मारा ताव
विसरून राग रुसवे फुगवे मिटवा एकमेकांतला वाद
रंगवू एकमेकांना सप्तरंगात
धुलिवंदनाचा सण एकत्र करू साजरा
होलिका दहन २०२६ च्या शुभेच्छा
प्रेमासाठी लाल, समृद्धीसाठी हिरवा,
यशासाठी केशरी आणि आनंदासाठी गुलाबी
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या रंगांचा आशीर्वाद मिळो.
हॅपी होळी
मनोभावे करूया होलीका मातेची पूजा
मनोभावे करूया होलीका मातेची पूजा
मनातील वैरभाव करूया वजा
होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा
होळीच्या खूप खूप शुभेच्छा
राखू मांगल्य होळी सणाचे
नको द्वेष आकस आणि अहंकार
नैवेद्य दाखवुनी पुरणपोळीचा
ऐकू अवनीचे मधुर हुंकार
जुने हेवेदावे जुनी भांडणे होळीमध्ये टाकूया
जुने हेवेदावे जुनी भांडणे होळीमध्ये टाकूया,
विसरून जाऊ द्वेष आणि सारे नातेसंबंध राखुया
होळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
होळी मनातील वाईट विचार जाळण्यासाठी
होळी निसर्गातील पानगळ जाळण्यासाठी
होळी मनातील वाईट विचार जाळण्यासाठी
असा हा सण मनातील मरगळ घालविण्यासाठी
मनाला नवचेतना देण्यासाठी
होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
कुत्रीम रंगांना टाळू या
नैसर्गिक रंग वापरु या
पाण्याची बचत करता
पर्यावरणाचे भान जपू या
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
