Fire Prevention Measures at Agashivnagar Garbage Depot

मलकापूर, ता. २० : आगाशिवनगरच्या कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या लोट व त्यातून नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत दै. ‘सकाळ’ने पालिकेला कधी जाग येणार अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पालिकेला जाग आली असून, पालिकेने या ठिकाणी चोवीस तास डंपिंग यार्ड रेनगन बसवली आहे. त्यामुळे आग लागणार नाही, याची पालिकेने दक्षता घेतली आहे. या निर्णयाचे व दै. ‘सकाळ’चे अभिनंदन होत आहे.
आगाशिवनगर कचरा डेपोच्या ठिकाणी प्रमाणावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. त्या कचऱ्याला अचानकपणे आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या कचरा डेपोतून निघणारे धुराचे लोट शास्त्रीनगर, लाहोटीनगरसह महामार्गाच्या बाजूला पसरतात. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रासाबरोबरच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आग विझविण्यासाठी मलकापूर पालिकेकडे अग्निशमन यंत्रणाही उपलब्ध नाही. तीन वर्षांत अनेकदा या कचरा डेपोला आग लागण्याचा प्रकार घडला आहे. १५ दिवसांपूर्वी सलग तीन दिवस हा कचरा जळत होता. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी या कचरा डेपोला आग लागली होती.
त्यानंतर दै. ‘सकाळ’ने पालिकेला जाग कधी येणार? अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. पालिकेने तातडीने आग प्रतिबंधक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पावले उचलली. डंपिंग यार्डमध्ये रेनगन बसवली आहे. या रेनगनला सांडपाणी प्रक्रिया योजनेतून प्रक्रिया केलेल्या मलजलाचा पुरवठा केला आहे. त्यामुळे कचरा डेपोला लागणारी आग भविष्यात लवकर आटोक्यात येऊ शकते. ही रेनगन वर्तुळाकार ३६० अंश फिरू शकते. त्यामुळे तिच्या कक्षेत डंपिंग यार्डचा बहुतांश क्षेत्र येत असल्याने शेजारील शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

…..
काेट
………….

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart