Aaditya Thackeray Claims Rajya Sabha Seat Criticizes Fake Government

Aaditya Thackeray Claims Rajya Sabha Seat Criticizes Fake Government

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज शिवजयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर माध्यमां

.

दिल्लीतील एआय (AI) एक्स्पोमध्ये गलगोटिया विद्यापीठाने विद्यार्थ्यांऐवजी चीनमध्ये बनवलेला ‘रोबोटिक कुत्रा’ स्वतःचा म्हणून प्रदर्शित केला. या वादाचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. “सरकार खोदून काढायचे झाले तर सगळेच भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत. आजच्या सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट झाली आहेत. हे सरकार भ्रष्टाचाराने पोखरलेले असून जगात आमची नाचक्की होत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

एआय समिटमध्ये पाणी, जेवणाची व्यवस्था नाही

दिल्लीतील एआय समिटमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. जगभराचे लक्ष या समिटकडे आहे, पण तिथे पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही. कोणत्याही नेत्यांच्या फोटो तिथे लावले जात नाहीत, पण सरकारने नेत्यांची फोटो लावले, तिथे फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेचे काम दाखवले जाते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई सुशोभीकरणाचा फज्जा

मुंबईतील विकासकामांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. “सुशोभीकरणाचा ९९ टक्के निधी केवळ सत्ताधारी लोकांशी संबंधित कंत्राटदारांकडे गेला आहे. मुंबईत एकही रस्ता पूर्ण झालेला नाही, पण अनेक ठिकाणी ‘डबल रंगरंगोटी’ करून पैसे लाटले जात आहेत. आमचे काम गलगोटियासारखे बनावट नाही. आम्ही जे करतो ते प्रत्यक्षात दिसते. असले ‘डुप्लिकेट’ काम फक्त हे ‘डुप्लिकेट’ सरकारच करू शकते,” अशा कठोर शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.

राज्यसभेच्या जागेवर ठोकला दावा

आगामी राज्यसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी ‘रोटेशन’चा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही. सध्या ज्या चर्चा समोर येत आहेत, त्या सध्या अफवा सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील रोटेशननुसार आता शिवसेनेच्या उमेदवाराची वेळ आहे.” या विधानातून त्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा ठोकला आहे.

हे ही वाचा…

माझा पक्ष, माझा बाप अन् आता भाऊही पळवला:राज-एकनाथ भेटीनंतर अनेकांना पोटशूळ उठले; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच, शिंदे गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. “या भेटीमुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे,” अशा शब्दांत शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडले आहे. सविस्तर वाचा…

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart