Thursday, March 19, 2026
HomeSportमहिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या हायप्रोफाइल बाबाला बेड्या; कोण आहे कॅप्टन अशोक खरात?...

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या हायप्रोफाइल बाबाला बेड्या; कोण आहे कॅप्टन अशोक खरात? फोटो व्हायरल; चाकणकर विरोधकांच्या रडारवर Nashik Marathi News | High profile man who sexually abused ladies arrested from nashik Who is Captain Ashok Kharat Photo goes viral Chakankar on the opposition’s radar

नाशिक : भोंदूगिरी करणारा स्वयंघोषित कॅप्टन ज्योतिषी अशोककुमार एकनाथ खरात याला पोलिसांनी बलात्कारप्रकरणी अटक केली आहे. २८ वर्षीय पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी खरात यास न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. २४) पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून, मंत्र-तंत्राच्या नावाखाली संमोहन करत पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. 

नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल; चाकणकर विरोधकांच्या रडारवर
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची खरातसोबत काही छायाचित्रे माध्यमांमधून व्हायरल झाली आहेत. यामध्ये एका छायाचित्रात चाकणकर यांनी खरात याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे, तर दुसऱ्या छायाचित्रात त्या पाद्यपूजा करताना दिसत आहेत. यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या खरातविरुद्ध फिर्याद देणाऱ्या पीडित महिलेला महिला आयोगाकडून न्याय मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलिस तपासावर विश्वास कॅप्टन खरातचे वैयक्तिक आयुष्य 
किंवा त्याच्यावर झालेल्या आरोपाबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत, त्याची पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलिस तपासावर माझा विश्वास आहे.
रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

५८ व्हिडीओ असलेला पेनड्राइव्ह पोलिसांच्या हाती
खरात याच्यासंदर्भातील एका पेनड्राइव्हमध्ये असलेले ५८ व्हिडीओ पोलिसांनी जप्त केले आहेत. या व्हिडीओंचा सखोल तपास केला जात असून, तांत्रिक विश्लेषण शाखेचीसुद्धा मदत घेतली जात आहे. 

नेमके प्रकरण काय? फिर्यादीत काय म्हटले?
नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरातील कॅनडा कॉर्नर येथील एका इमारतीमध्ये खरात याच्या कार्यालयात आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. खरात याने फिर्यादी महिलेचा भावनिक, धार्मिक विश्वास संपादन केला. 

त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले. संमोहित अवस्थेत पीडिता गेल्यानंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन खरातने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कोण आहे कॅप्टन अशोक खरात? –
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमध्ये सेवेत होता. २२ वर्षे सेवा बजावल्यानंतर तो निवृत्त झाला. त्याने १५४ देशांमध्ये प्रवास केल्याची चर्चा आहे. सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी खरात, तर सदस्यांमध्ये रूपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. सेवानिवृत्तीनंतर अंक शास्त्र अन् ज्योतिषी म्हणून व्यवसाय सुरू केला. राज्यातील मोठे मंत्री खरातकडे ‘भविष्य’ जाणून घेण्यासाठी येऊ लागल्याने सर्वत्र तो चर्चेत आला. खासगी विमानाने प्रवास करण्यापासून त्याची ‘लॅव्हिश लाइफस्टाइल’ अनेकांना चक्रावून टाकणारी होती.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments