Price: ₹250 - ₹165.00
(as of Mar 15, 2026 19:30:16 UTC – Details)
उचल्या’मुळे जितके आनंदाचे दिवस पाहिले तेवढेच दुःखाचे दिवस पण मला पहावयास मिळाले. काही लोकांना माझ्या मोठेपणामुळे जेवढे चांगले वाटले तेवढेच काहींना वाईटसुद्धा वाटले.
‘उचल्या’मुळे विमुक्त भटक्या समाजाच्या समस्येला, त्यांच्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. ‘उचल्या’चे इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तेलगू, उर्दू भाषिकांना तर माझे अनुवादित पुस्तक वाचून ‘डिनोटिफाइड ट्राइब्ज’ जमातीच्या व्यथा प्रथमच कळल्या. यामुळे भारतातल्या अनेक विद्यापीठांना पुस्तके तर लागलीच; पण काहींनी तर ‘उचल्या’वर पीएच.डी. करून डॉक्टरेटही मिळविली.
‘उचल्या’चे देशातील विविध भाषांत अनुवाद झाले आणि त्या त्या भाषेमधील वेगवेगळ्या प्रांतातील हजारो वाचक आज माझ्यावर भरभरून प्रेम करत आहेत. यामुळे मला देशभर विविध साहित्याच्या कार्यक्रमांसाठी बोलावले जाते. अनेक दिग्गज साहित्यिकांशी आणि नेत्यांशी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या गाठीभेटी झाल्या. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी भारताच्या चार पंतप्रधानांशी बोलण्याची आणि भेटण्याची संधी मिळाली.
– लक्ष्मण गायकवाड
From the Publisher
Uchlya by Lakshman Gaikwad

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त तसेच भारततील अनेक भाषात भाषांतर झालेले एका उचल्याचे आत्मचरित्र…
चोर, गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या व पालावर राहणाऱ्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी झटणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याची असामान्य अशी आत्मकथा संग्रही असायालाच हवी.
———————————————————————————–
‘उचल्या’मुळे जितके आनंदाचे दिवस पाहिले तेवढेच दुःखाचे दिवस पण मला पहावयास मिळाले. काही लोकांना माझ्या मोठेपणामुळे जेवढे चांगले वाटले तेवढेच काहींना वाईटसुद्धा वाटले.
‘उचल्या’मुळे विमुक्त भटक्या समाजाच्या समस्येला, त्यांच्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. ‘उचल्या’चे इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तेलगू, उर्दू भाषिकांना तर माझे अनुवादित पुस्तक वाचून ‘डिनोटिफाइड ट्राइब्ज’ जमातीच्या व्यथा प्रथमच कळल्या. यामुळे भारतातल्या अनेक विद्यापीठांना पुस्तके तर लागलीच; पण काहींनी तर ‘उचल्या’वर पीएच.डी. करून डॉक्टरेटही मिळविली.
‘उचल्या’चे देशातील विविध भाषांत अनुवाद झाले आणि त्या त्या भाषेमधील वेगवेगळ्या प्रांतातील हजारो वाचक आज माझ्यावर भरभरून प्रेम करत आहेत. यामुळे मला देशभर विविध साहित्याच्या कार्यक्रमांसाठी बोलावले जाते. अनेक दिग्गज साहित्यिकांशी आणि नेत्यांशी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या गाठीभेटी झाल्या. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी भारताच्या चार पंतप्रधानांशी बोलण्याची आणि भेटण्याची संधी मिळाली.

Lakshman Gaikwad
श्री. लक्ष्मण मारुती गायकवाड यांचा जन्म 23 – 7 – 52 रोजी धनेगाव, लातूर येथे झाला. शोषित, पीडित समाजघटकांमध्ये सामाजिक परिवर्तन करणारे आणि विमुक्त, भटक्या जमातीच्या लोकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी 1978 पासून कार्यरत असलेले गायकवाड महाराष्ट्र पातळीवरील विमुक्त भटके संघर्ष महासंघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतात.
कामगार, शेतमजूर, हॉटेल बॉईज, स्त्री मुक्ती इत्यादी चळवळींत ते सक्रिय सहभागी असतात. 1984 साली निघालेल्या विमुक्त भटक्यांच्या लातूर ते मुंबई या शोधयात्रेचे ते संयोजक होते. समाजकार्य व लेखनाची आवड असलेल्या गायकवाड यांनी मुंबई येथे भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेमध्ये दलित समाजाबद्दल विचार मांडले. भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मा. राजीव गांधी, मा. व्ही.पी. सिंग, मा. पी.व्ही. नरसिंह राव या भारताच्या तीन पंतप्रधानांबरोबर चर्चा केली. भारताच्या महत्त्वपूर्ण सहा साहित्यिकांच्या शिष्टमंडळामध्ये अभ्यासासाठी 1994 मध्ये त्यांनी चीनचा महत्त्वपूर्ण दौरा केला.
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Customer Reviews
3.7 out of 5 stars 38
3.3 out of 5 stars 8
4.4 out of 5 stars 8
3.7 out of 5 stars 62
3.7 out of 5 stars 97
3.8 out of 5 stars 58
Price
₹250.00₹250.00
— no information
₹204.00₹204.00
— no information
— no information
₹160.00₹160.00
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.
Publication date : 1 January 2021
Edition : Third
Language : Marathi
Print size : 216 pages
ISBN-10 : 9352200942
ISBN-13 : 978-9352200948
Item Weight : 240 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book