Pune Cab Driver lifeless Student arrest : प्रवासादरम्यान अन्सारीने अनेकांना फोन करून आर्थिक मदत मागितली, मात्र मदत न मिळाल्याने त्याने आदर्शला चाकू दाखवून धमकावल्याचा आरोप आहे. प्रतिकार करताना आदर्शच्या हातातील चाकूमुळे अन्सारीचा जीव गेल्याचा दावा केला जात आहे.

नेमकं काय घडलं?
आदर्श चार दिवसांपूर्वी आपल्या मित्राला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. प्रवासादरम्यान अन्सारीने अनेकांना फोन करून आर्थिक मदत मागितली, मात्र मदत न मिळाल्याने त्याने आदर्शला चाकू दाखवून धमकावले. प्रतिकार करताना आदर्शच्या हातातील चाकूमुळे हत्या झाली.
बॉडी टाकून पळाला
घाबरलेल्या आदर्शने बॉडी पुण्यातील गणेशखिंड परिसरात रस्त्याच्या कडेला सोडला आणि टॅक्सी घेऊन थेट टिटवाळ्यात आला. तिथे गोवेली परिसरात टॅक्सी सोडून पळून गेला.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्या टॅक्सीत रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्या गाडीच्या नंबरवरून चालकाचा शोध घेतला असता हत्येचा प्रकार समोर आला. त्यानंतर आदर्शला अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे विभाग तपास करत आहे.
Ratnagiri Crime : ड्रायव्हर सीट मागे करुन झोपलेला, पण तोंडातून फेस दिसताच लोकांनी काच फोडली; कोकणात बंद कारमध्ये तरुणाची बॉडी सापडली
पतीकडून शिक्षक पत्नीची सुपारी; दोघांना अटक
दुसरीकडे, बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात पेसोडा फाट्यावर अपघातात शिक्षिका ठार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मात्र, पोलिस तपासात तो अपघात नसून पतीने सुपारी देऊन पत्नीची केलेली हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पतीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
Crime News : कॉलेज विद्यार्थिनीच्या खोलीतच 25 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने जीव दिला, तरुणीचा आरडाओरडा, निंबाळकर कुटुंब शोकसागरात
मृत शिक्षिका वैशाली हिचा पती प्रकाश उर्फ भय्या गावंडे याने शेगाव येथील मालवाहू वाहनाचा चालक मनीष नारायणसिंग सूर्यवंशी याला पत्नीची हत्या करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. प्रकाश गावंडे व मनीष सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही वर्षात पहिल्या उद्घाटनाला अजितदादा नाहीत, मुरलीधर मोहोळांनी आठवण सांगितली
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होत्या. २ मार्च रोजी कवठळ रोडवर पेसोडा फाट्याच्या पुढे अपघात झाला होता. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला होता. यादरम्यान शिक्षिकेचे माहेर असलेल्या जस्तगाव परिसरात हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा होती.
