Arjun Tendulkar and Sania Chandok grand wedding ceremony ceremony in Mumbai: तेंडुलकर कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाह बंधनात अडकला. सानिया चंडोकसोबत त्यानं साताजन्माची गाठ बांधली. हा भव्य विवाह सोहळा मुंबईतील वरळी येथे पार पडला. या लग्नसोहळ्यात खास दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिडा विश्वातील दिग्गज, उद्योगपती आणि नेते मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि सानियाच्या विवाहसोहळ्यातील विधींना सुरुवात झाली होती. हळदी समारंभ आणि मेहंदी समारंभ सोहळा अगदी थाटात पार पडला. या सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, या विवाह सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला. सकाळी पावणे बाराच्या दरम्यान, हा सोहळा पार पडला असल्याची माहिती आहे. या खासदिनी सानिया चंडोकने लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये सानिया चंडोक अगदी सुरेख दिसत होती. तिनं केस मोकळे सोडले होते. तर, अर्जुन तेंडुलकरनेही पारंपारिक पोशाख परिधान केला होता. त्यानं लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्न सोहळा सुरु असताना सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर जवळ उभे होते. सचिन यांनी सिल्व्हर रंगाची शेरवानी घातली होती. तर, अंजली यांनी गुलाबी रंगाली साडी नेसली होती. दोघे खूप आनंदात दिसत होते.
अर्जुन आणि सानियाने एकमेकांना हार घातले. नंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. या लग्न सोहळ्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करुन शुभेच्छा दिल्या.
वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये खेळाडूंपासून नेते मंडळींनी हजेरी लावली. या लग्न सोहळ्यात, अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे, अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सुनील गावस्कर, शंकर महादेवन, फरहान अख्तर, युवराज सिंह, शायना एनसी, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी, आशिष नेहरा, श्रेयस अय्यर, इरफान पठाण उपस्थित होते. तसेच बिग बी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खाननेही हजेरी लावली. या सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळींनी कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
आणखी वाचा