Wednesday, March 4, 2026
HomeTechnologyMaharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही...

Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?

Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली असली, तरी महाराष्ट्राचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चा अजूनही सुरूच आहे. दरम्यान, भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मात्र राज्यसभेचा कार्यकाळ समाप्त होत असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. राज्यसभा उमेदवारांची आज यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आता यादीत नवीन चार कोण आहेत याची सुद्धा चर्चा रंगली आहे. दुसरीकडे रामदास आठवले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता रामदास कदम यांना उमेदवारीसंदर्भात साशंकता असल्याने भेटीसाठी पोहोचले का? असेही बोलले जात आहे. 

सहा राज्यांमधील नऊ जणांना उमेदवारी

दुसरीकडे, काल मंगळवारी, भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये सहा राज्यांमधील नऊ जणांना उमेदवारी देण्यात आली. बिहारमधून भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि शिवेश कुमार यांना उमेदवारी दिली. आसाममध्ये तेराश गोवाला आणि जोगेन मोहन यांना उमेदवारी देण्यात आली. लक्ष्मी वर्मा यांना छत्तीसगडमधून, तर संजय भाटिया यांना हरियाणामधून संधी देण्यात आली. ओडिशामधून मनमोहन सामल आणि सुजीत कुमार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील आणि राहुल सिन्हा हे पश्चिम बंगालमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील.

निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी मतदानाचे वेळापत्रक निश्चित केले आहे, त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्चपर्यंत पूर्ण होईल. महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या 10 राज्यांमधील 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुका होतील.

तृणमुलकडून चार उमेदवार जाहीर

तृणमूल काँग्रेस (एआयटीसी) ने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. बाबुल सुप्रियो, राजीव कुमार, मेनका गुरुस्वामी आणि कोएल मल्लिक यांचा समावेश आहे. माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, जे नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले, ते सध्या पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. राजीव कुमार हे पश्चिम बंगालचे माजी पोलिस महासंचालक आहेत. वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी या संवैधानिक बाबींमध्ये कायदेशीर काम करण्यासाठी ओळखल्या जातात, तर कोएल मल्लिक बंगाली चित्रपट उद्योगातील एक प्रमुख व्यक्ती आहेत. बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओडिशा विधानसभेचे विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी यापूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली होती. पटनायक यांनी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी डॉ. संतृतुप्त मिश्रा आणि डॉ. दत्तेश्वर होता यांची उमेदवार म्हणून नावे जाहीर केली.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments