Sunday, March 1, 2026
HomeTechnologyNana Patekar Webseries: नाना पाटेकरांची पहिली वेबसीरिज 'संकल्प', प्रोमो जबरदस्त; कुठे बघाल?...

Nana Patekar Webseries: नाना पाटेकरांची पहिली वेबसीरिज ‘संकल्प’, प्रोमो जबरदस्त; कुठे बघाल? – Marathi News | Nana Patekar first sankalp internet collection Sanjay Kapoor and Neeraj Kabi

नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत काम करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नानांनी ‘काला’ सिनेमातून रजनीकांतसोबत काम करुन साउथ इंडस्ट्रीमध्येही काम केलंय. नाना अलीकडेच ‘ओ रोमियो’ या सिनेमात झळकले. या सिनेमात नानांनी साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं. अशातच नाना आता आगामी हिंदी वेबसीरिजमध्ये काम करणार आहेत. या वेबसीरिजचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे.

नानांच्या वेबसीरिजचा प्रोमो, कुठे बघाल?

नाना पाटेकरांची आगामी वेबसीरिज ‘संकल्प’चा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत नाना एका पंडिताच्या भूमिकेत दिसत आहेत. या पंडिताला त्या भागात मोठा आदर-सन्मान असलेला दिसतोय. प्रत्येक मोठा व्यक्ती येऊन पंडिताशी सल्लामसलत करताना दिसतो. अशातच प्रोमोच्या शेवटी नानांचं हिंसक रुप पाहायला मिळतं. अवघ्या काही सेकंदांचा हा प्रोमो जबरदस्त असून नानांचा संयमी तरीही आक्रमक अवतार बघायला मिळतोय. 

प्रकाश झा यांनी ‘संकल्प’ या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सीरिजमध्ये नाना पाटेकरांसह मोहम्मद झिशान अयुब, कुब्रा सैत आणि संजय कपूर हे कलाकार पाहायला मिळत आहेत. MX प्लेअरवर ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. अजूनतरी या वेबसीरिजची रिलीज डेट समोर आली नाहीये. नाना पाटेकरांना पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिजमध्ये बघण्यास, त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments