Friday, March 20, 2026
HomeBusinessPakistan Semi-Final Scenario : श्रीलंका OUT, पण पाकिस्तान अजूनही रेसमध्ये… सेमीफायनलचं गणित...

Pakistan Semi-Final Scenario : श्रीलंका OUT, पण पाकिस्तान अजूनही रेसमध्ये… सेमीफायनलचं गणित बदललं, समीकरण पाहून सगळेचं चक्रावले

T20 World Cup 2026 Pakistan Semi-Final Scenario : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून अधिकृतरीत्या बाहेर पडणारा पहिला संघ म्हणून श्रीलंकेची नोंद झाली आहे. श्रीलंकेच्या या पराभवानंतर मात्र पाकिस्तान आणि त्यांच्या चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. कारण पाकिस्तानसाठी अजूनही उपांत्य फेरीचे दार पूर्णपणे बंद झालेले नाही. सुपर-8 च्या गट 2 मध्ये पाकिस्तानसोबत इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ आहेत. न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. या गटातून इंग्लंडने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता पाकिस्तानसमोर एकच लक्ष्य आहे, न्यूझीलंडला मागे टाकत शेवटच्या क्षणी सेमीफायनलमध्ये घुसणे.

पाकिस्तानसाठी नेमकं समीकरण काय? 

1. इंग्लंडने न्यूझीलंडला हरवणे आवश्यक

जर इंग्लंडने शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. तर, इंग्लंडचे 6 गुण होतील आणि ते गटात अव्वल राहतील. न्यूझीलंड 3 गुणांवर थांबेल.

2. पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवणे आवश्यक

पाकिस्तानने आपल्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला हरवल्यास त्यांचेही 3 गुण होतील. अशा वेळी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे गुण समान (3-3) होतील आणि मग निर्णय नेट रन रेट (NRR) वर होईल.

नेट रन रेटचं मोठं आव्हान

सध्या पाकिस्तानचा -0.461 नेट रन रेट आहे, तर न्यूझीलंडचा +3.050 नेट रन रेटने आहे. ही तफावत प्रचंड आहे. त्यामुळे पाकिस्तानला केवळ विजय नाही, तर दणदणीत आणि मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे.

जर इंग्लंडने न्यूझीलंडला 50 धावांनी हरवले, तर पाकिस्तानला श्रीलंकेवर किमान 20 धावांनी विजय मिळवावा लागेल. पण जर पाकिस्तान लक्ष्याचा पाठलाग करत असेल, तर त्यांना साधारण 17.5 षटकांत लक्ष्य गाठावे लागेल. थोडाही उशीर झाला तर नेट रन रेटमध्ये ते मागे पडू शकतात.

सगळं अवलंबून इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यावर

कोलंबोमध्ये होणारा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’सारखा आहे.  जर न्यूझीलंड जिंकला, तर पाकिस्तानचे आव्हान तत्काळ संपुष्टात येईल. पण जर इंग्लंड विजयी झाला, तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दार शेवटच्या क्षणी उघडू शकते.  आता पाकिस्तानच्या चाहत्यांच्या नजरा एका सामन्यावर खिळल्या आहेत.

हे ही वाचा –

India vs Zimbabwe: अखेर कॅप्टन सूर्या अन् गुरुजी गंभीर यांच्या अतिआत्मविश्वासाचं विमान जमिनीवर आलं! झिम्बाब्वेविरुद्ध दोन बदलांवर आले, अशी असणार टीम इंडिया

आणखी वाचा

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments