शक्तीपीठ महामार्गाला परभणीत तीव्र विरोध:350 लोकांच्या गावात 600 पोलिसांचा फौजफाटा, सतेज पाटील आणि राजू शेट्टींचा सरकारवर प्रहार

शक्तीपीठ महामार्गाला परभणीत तीव्र विरोध:350 लोकांच्या गावात 600 पोलिसांचा फौजफाटा, सतेज पाटील आणि राजू शेट्टींचा सरकारवर प्रहार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला परभणी जिल्ह्यातील सहजपूर येथे शेतकऱ्यांनी आज (20 फेब्रुवारी) रस्त्यावर उतरून तीव्र विरोध दर्शवला. भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला, अशा टोकाच्या घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे, अवघ्या 350 लोकसंख्या असलेल्या या गावात प्रशासनाने 600 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. यावर आता कॉंग्रेस नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सतेज पाटील म्हणाले, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यात सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपुर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध. तसेच राजू शेट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हणाले, पोलिसाकडून शेतकऱ्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून रानातून हाकलून लावण्याचा प्रयत्न आहे. शक्तीपीठ महामार्गाद्वारे शक्तीपीठांना जोडण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र, कोणीही अशा महामार्गाची मागणी केली नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने आराखड्यात बदल करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात कागल व हातकणंगले तालुक्यात भूसंपादनाला विरोध असलेला भाग प्रकल्पातून वगळला. तसेच नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि धाराशिव जिल्ह्यांतही काही बदल करण्यात आले. तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. ‘गोळ्या घाला अन् जमीन मोजा’ म्हणत शेतकरी रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाविरोधात परभणी जिल्ह्यात मोठा विरोध होत आहे. जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी या महामार्गाविरोधात करस्त्यावर उतरले. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला, अशी संतप्त नारेबाजी हे शेतकरी करत आहेत. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. गंभीर गोष्ट म्हणजे या गावात एकूण लोकसंख्येपेक्षा पोलिसांचा फौजफाटा जास्त झाला आहे. यावरून या घटनेची दाहकता स्पष्ट होते. वाचा सविस्तर

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart