शिवरी येथे दहावीची परीक्षा सुरळीत पुणे सुरू

खळद, ता. २० : शिवरी (ता. पुरंदर) येथे महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय या दहावीच्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली. यावेळी सर्व परीक्षार्थीं विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन शिक्षकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी केंद्र संचालक प्राचार्य रमेश महाडिक, उपकेंद्र संचालक श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळदचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे, साकुर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश कामथे, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव तानाजी झेंडे, पुरंदर शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव रमेश बोरावके, परीक्षा विभाग प्रमुख नितीन कोलते आणि इतर सहकारी पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
येथे महात्मा ज्योतिराव फुले माध्यमिक विद्यालय शिवरी, श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद, मातोश्री जिजाऊ माध्यमिक विद्यालय साकुर्डे, बालसिध्दनाथ माध्यमिक विद्यालय बेलसर, शिवशंभो माध्यमिक विद्यालय एखतपूर येथील एकूण १८२ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यांची बैठक व्यवस्था आठ ब्लॉकमध्ये सुयोग्य पद्धतीने केली आहे. परीक्षेचे नियोजन शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावे, यासाठी केंद्र प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असल्याचे केंद्र संचालक रमेश महाडीक यांनी सांगितले.
यावेळी मुलांनी मोकळ्या वातावरण काॅपीमुक्त परीक्षा द्यावी, वेळेचे योग्य नियोजन करून पेपर लिहावा अशा सूचना उपस्थितांनी दिल्या.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart