भिगवण महाविद्यालयात ‘डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला’

भिगवण, ता. २० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहिःशाल शिक्षण मंडळ व येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित केलेली तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला नुकतीच झाली. या व्याख्यानमालेतून विचारांना दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

व्याख्यानमालेचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर यांचे हस्ते केले. यावेळी व्याख्यानमालेचे संयोजक प्रा. संदीप साठे, डॉ. भास्कर गटकुळ, डॉ. प्रशांत चवरे, डॉ. अनिल बनसोडे, डॉ. राजेंद्र साळुंखे उपस्थित होते. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुणे येथील प्रा. मुबीन तांबोळी यांनी ‘यशाचा पासवर्ड’ या विषयावर गुंफले.

प्रा. तांबोळी म्हणाले, ‘‘यश मिळवण्यासाठी केवळ जिद्द असून चालत नाही, तर त्याला शिस्त आणि योग्य नियोजनाची जोड असावी लागते. तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःचे कौशल्य अपडेट ठेवणे हाच यशाचा खरा पासवर्ड आहे.’’

दुसरे पुष्प ‘आनंदाची लयलूट’ गुंफताना प्रा. मारुती यादव म्हणाले की, आनंद हा बाहेर शोधण्यापेक्षा तो आपल्या स्वभावात आणि छोट्या कृतीत शोधायला हवा. त्यांच्या खुमासदार शैलीतील मार्गदर्शनास विद्यार्थ्यांनी उत्साही प्रतिसाद दिला. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बारामती येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्रा. विजय काकडे यांनी ‘सावित्रीबाई फुले’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफले.

प्रा. संदीप साठे यांनी प्रास्ताविक तर, प्रा. सारिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गोविंद अग्रवाल यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. अमोल वाघ, प्रा. श्याम सातार्ले, प्रा. भाऊसाहेब सकुंडे, प्रा. विनोद भुजबळ, प्रा. पद्माकर गाडेकर, प्रा. समीर बळे, प्रा. आरती काळंगे, प्रा. वर्षा दराडे, प्रा. भाग्यश्री हाके, प्रा. ऋतुजा वाघमोडे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart