सुरूरच्या शिवाजी स्कूलमध्ये
मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात
कवठे, ता. २० : सुरूर (ता. वाई) येथील श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मातृ-पितृ पूजन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जाणीव निर्माण व्हावी, हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. रूपाली जाधव प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत सोहळ्यास प्रारंभ झाला. शिक्षिका वर्षा गार्डी यांनी हृदयस्पर्शी कथेद्वारे मातृ- पितृ पूजन दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आई- वडील हेच आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत, असे सांगत त्यांनी पालकांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापिका रेखा राजे यांनी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पित्यांचे विधिवत पूजन करून त्यांच्या चरणी पुष्प अर्पण केले. संस्कार, कुटुंबमूल्ये आणि आदरभाव यावर आधारित मार्गदर्शनपर भाषणांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. खडसरे यांनी सूत्रसंचालन केले. मांढरे यांनी आभार मानले.
…………………………………………………
फोटो :…………01333
सुरूर : शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मातृपूजनप्रसंगी चिमुकले.
…………………………………………………..