नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः शेतीव्यवस्था, हायब्रिड शेतीचे दुष्परिणाम, स्त्रीवरील सामाजिक दबाव आणि आधुनिकतेची किंमत यावर भाष्य करणारा सामाजिक संदेश हायब्रीड या नाटकातून देण्यात आला. एका शेतकरी कुटुंबाची संघर्षमय प्रवासाची कथा लेखक नितीन सावळे यांनी मांडली आहे. दिग्दर्शक प्रा. परसू गावडे यांच्या संकल्पनेतून राज्य नाट्यस्पर्धेत चंदगड येथील श्रीसाई नाट्यधारा या संस्थेने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सादर केला. शेतीव्यवस्था आणि स्त्रीवरील सामाजिक दबाव याचा उलगडा या नाटकातून झाला. रसिकांनी कलाकारांच्या अभिनयाला दाद दिली.
———-
काय आहे नाटक0
‘हायब्रिड’ हे दोनअंकी नाटक ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित आहे. पंढरी, त्याची पत्नी उमा, आई आक्का या कुटुंबाभोवती कथा फिरते. उमा हिला लग्नानंतर बराच काळ मूल होत नाही म्हणून आक्का तिला सतत टोमणे मारत असते. पंढरीचा भाऊ गणेश व त्याची पत्नी सरिता उमाला समजावण्याचा प्रयत्न करतात; पण घरातील तणाव वाढतच जातो. दरम्यान, पंढरी शेतीत गुंतलेला असतो; पण शेतात पाण्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि आर्थिक अडचणी वाढतात. आक्का डॉक्टरांकडे उमाची तपासणी करून घेते. डॉक्टर सांगतात की, आधुनिक उपचाराने आई होण्याची शक्यता आहे; पण उपचार खर्चिक आहेत. आक्का हट्टाने उपचार करण्याचा आग्रह धरते. पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही तरी कुटुंब पुन्हा पैसे जमवून दुसरा उपचार करते आणि शेवटी उमा गर्भवती होते; पण उपचारांचा खर्च, शेतीचे नुकसान, खतांची कमतरता, कर्ज आणि बाजारातील महागाई यामुळे पंढरी आर्थिकदृष्ट्या कोलमडतो. शेवटी, प्रसूतीदरम्यान दुर्दैवाने उमाचा मृत्यू होतो; पण मुलाचा जन्म होतो नंतर पंढरीची “प्रगतशील शेतकरी” म्हणून मुलाखत घेतली जाते. नाटकात गावातील घर, सत्कार सोहळा आणि मुलाखतीच्या प्रसंगांमधून कथानक पुढे नेले जाते. शेतीव्यवस्थेची बिकट स्थिती, रासायनिक खते, बियाणे, खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती तोट्यात जात आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडतो. हायब्रिड पद्धतीचा दुष्परिणाम जास्त उत्पादनाच्या नादात शेतीचे नैसर्गिक संतुलन बिघडते आणि त्याचे दूरगामी दुष्परिणाम पुढील पिढ्यांवर होतात, हा मुद्दा ””हायब्रीड”” या नाटकातून ठळकपणे मांडला आहे.
——-
* सूत्रधार आणि सहाय्य
वेशभुषा ः आप्पा गावडे, अनुराधा काकतकर, नेपथ्य ः गिरीशा पाटील, पार्श्वसंगीत ः राणी लोहार, प्रकाशयोजना ः राजेश शिंदे.
———
* पात्र परिचय
आक्का ः राधिका शिंदे, पंढरी ः परसू गावडे, उमा ः श्रेय्या सव्वाशेरी, सरिता ः मनाली पाटील, गणेश ः जयदीप कोंडोलीकर, संदीप ः आप्पा गावडे, पप्या ः सक्षम जाधव, युवराज ः निहाळ रूकडीकर, अंकुश ः कुणाला हिरोजी, डॉक्टर ः अनुराधा काकतकर, वच्छी ः प्राची कदम, कमिशन ः चिन्मय शेंडे, राठोड ः मंदार बापट, इसम ः स्वराज पाटील, गुणिश पाटील, अनुष्का जाधव, सक्षम जाधव, आयुष देसुरकर, सुमित मुचंडी.
———-
* आजचे नाटक
नाटक ः पोकळ धिस्सा. सादरकर्ते ः शिवशक्ती तरुण मंडळ-सातारा. वेळ ः सायंकाळी ७.३० वाजता. स्थळ ः
—————-
ऑपरेटर.. बातमीदार…पांचाळ..२०.२.२६…………..