तळेगाव ढमढेरे, ता. २० : धानोरे (ता. शिरूर) येथे बेल्हे- जेजुरी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला.
धानोरे येथे बेल्हे- जेजुरी महामार्गालगत डॉ. संजय देवधरे यांच्या शेतालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा मृत झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांना मिळाली. त्यानंतर नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील, वन्यजीव बचाव पथकाचे गणेश टिळेकर, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, राहुल गायकवाड, शुभांगी टिळेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन माजी उपसरपंच विजय ढमढेरे, शिरीष ढमढेरे, रवींद्र जेधे, तात्यासाहेब ढमढेरे, रमेश शेलार यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याला ताब्यात घेतले. अज्ञात वाहनाच्या धडकेत सुमारे एक वर्षे वयाच्या मादी प्रवर्गातील बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पशु वैद्यकीय अधिकारी गोविंद राठोड यांच्या माध्यमातून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करत दहन करण्यात आले.