लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी
कुर्डू : राज्य शासनाची महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली लाडकी बहीण योजना ही स्व. अजित पवार यांच्या नावाने करण्यात यावी, अशी मागणी कुर्डू जिल्हा परिषद गटाचे नूतन जिल्हा परिषद सोलापूर सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरत असून, या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत आहे. स्व. अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. विशेषतः महिला सक्षमीकरण, सामाजिक विकास आणि ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.