पानीव फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

BON26B01871
पानीव ः राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मार्गदर्शक श्रीलेखा पाटील व इतर.

पानीव फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

बोंडले : पुणे येथील एमसीई सोसायटी संचालित, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (आझम कॅम्पस) येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तांत्रिक पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत पानीव येथील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील (डी.फार्मसी) ऋतुजा संतोष रासकर व कल्याणी भागवत रूपनवर या विद्यार्थिनींनी ‘फार्मासिस्ट एक आघाडीचे योद्धे’ या विषयावर सादरीकरण केले. यामध्ये त्यांच्याकडून फार्मासिस्टच्या आरोग्य सेवेतील महत्त्वाच्या भूमिका स्पष्ट करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना विभागप्रमुख प्रा. पंकज खुसपे व प्रा. देवता शिंदे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart