कळंबमध्ये शनिवारी कलशारोहण कार्यक्रम

महाळुंगे पडवळ, ता. २० : कळंब (ता. आंबेगाव) येथील माळीमळा मंदिराचा जिर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण शनिवार (ता. २१) ते रविवार (ता. २२) या कालावधीत होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती जीर्णोद्धार समिती, मुंजोबा महाराज मित्र मंडळ व बुवासाहेब मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली.
शनिवारी (ता. २१) सकाळी विधी, गणेश पूजन, मूर्तीला अभिषेक, कलश मिरवणूक, पूजा, महाआरती, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी कलश मिरवणूक गणेश महाराज घोडेकर व भक्ती शक्ती गुरुकुल बाल वारकरी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार आहे. रविवारी (ता. २२) सकाळी मांडवडहाळे व हारतुरे, पुजन, हवन व भक्ती शक्ती गुरुकुल संस्थेचे संस्थापक गणेश महाराज घोडेकर यांचे हरिकीर्तन‌ होणार आहे. मूर्तिप्राणप्रतिष्ठा पौरोहित्य यज्ञाचार्य विवेक गुरू यांच्या उपस्थितीमध्ये, कलशारोहण गुलाब महाराज खालकर यांच्या हस्ते, सुरेखा शिंदे आणि आदिनाथ महाराज जुन्नरकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart