TSG26B02009
कोर्टी (ता पंढरपूर) : येथील न्यू सातारा पॉलिटेक्निकमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य विक्रम लोंढे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
न्यू सातारा पॉलिटेक्निक, कोर्टी
……….
तिसंगी : कोर्टी (ता पंढरपूर) येथील न्यू सातारा पॉलिटेक्निकच्या प्रांगणात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय महिला संयोजक (प्रभारी महाराष्ट्र व गोवा) शोभा पैठणकर उपस्थित होत्या. यावेळी संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे, प्राचार्य विक्रम लोंढे, उपप्राचार्य विशाल बाड आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोनाली पवार या विद्यार्थिनीने भाषण तर श्रद्धा पडवळकर हिने पोवाडा सादर केला.