छत्रपती शिवरायांचा भोसरी परिसरात जयघोष

भोसरी, ता. २० ः डीजेचा दणदणाट…डोळे दिपाविणारी विद्युत रोषणाई…थिरकणारी तरुणाई…छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत घोड्यावरून मावळ्याच्या वेषभूषेसह मिरवणुकीत सहभागी झालेली तरुणाई…अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात भोसरी आणि शाहूनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.
भोसरीतील पीएमटी चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि भोसरी ग्रामस्थांद्वारे घेतलेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डीजेच्या आवाजात आणि आकर्षक विद्युत रोषणाईत तरुणाई थिरकताना दिसली. नागरिकांनी चौक आणि रस्त्यावरही गर्दी केली होती. राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील महामार्गाचा सेवा रस्ता रात्री अकरापर्यंत भोसरी पोलिस वाहतूक विभागाद्वारे बंद ठेवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. रात्री साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती करण्यात आली.
शाहुनगरातील नालंदा फाउंडेशन संचालित धम्मचक्र बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत साहिल इंगवले घोड्यावर स्वार होत मिरवणुकीत सहभागी झाले होते. धम्मानंद इंगवले, ‘‘धमानंद मेश्राम, शांताराम नवघरे, बळिराम पारडे आदी मावळ्यांच्या वेषभूषेत होते. जागोजागी नागरिकांनी त्यांचे फुलांचा वर्ष करत स्वागत केले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी धम्मभूषण सुरेश कसबे होते. सखाराम इंगवले, मंगेश सोनकांबळे, वैभव कसबे, अवी कांबळे, राजेंद्र वाघमारे, साहेबराव सोनवणे, अशोक इंगवले, प्रकाश जोगदंड, मधुकर धावारे, रामदास इंगळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन खराटे, हेमंत गायकवाड, विलास धावारे, प्रमिला सोनवणे, सारिका सोनकांबळे, नंदा मखरे, ऋतुजा कसबे, स्नेहल इंगवले, मनीषा ढावरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्मिता बडवाने यांनी केले. आभार मनीषा कसबे यांनी मानले.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart