Home - Martahi - मांडवगण फराटा येथे जर्सी गाईंची क्रूर वाहतूक
मांडवगण फराटा येथे जर्सी गाईंची क्रूर वाहतूक
मांडवगण फराटा, ता. २० : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गारमाळ येथे तीन जर्सी गाईंची चारा-पाण्याविना क्रूर वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, गुरुवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा येथील गारमाळ परिसरात संशयितांकडून जर्सी गाईंची अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षक अमोल चौगुले यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहन अडवून तपासणी केली. कारवाईदरम्यान सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या तीन जर्सी गाई, तसेच सुमारे ७ लाख रुपये किमतीचा फिकट पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टेंपो (क्र. एमएच १४ एमएच ९७०३) जप्त करण्यात आला. गाईंसाठी कोणत्याही प्रकारची चारा-पाण्याची व्यवस्था न करता त्यांना कोंबून वाहतूक केल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. पोलिस हवालदार एस. पी. खबाले यांनी पंचनामा केला. याबाबत पोलीस अंमलदार भाऊसाहेब शहाजी टेंगले यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी वैभव शिवाजी केदार (रा. सांगवी सारने, ता. केज, जि. बीड), अतीश चंद्रकांत नेटके (रा. जुना बाजार, मातृभूमी व्यायामशाळेमागे, खडकी, पुणे) व आकाश पोपट कळसकर (रा. तांदळी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खबाले करीत आहेत.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();