आळेफाटा, ता. २० ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय केंद्रावर सुरळीत प्रारंभ झाला. परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, सचिव डॉ. अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, केंद्र संचालक संदीप भवारी, उपकेंद्र संचालक सुनिल कोते, ज्ञानेश्वर वाघ, सुरेश कुऱ्हाडे उपस्थित होते. आळे केंद्रावर ७७३ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, विद्या विकास मंदिर राजुरी, श्री संभाजी विद्यालय बोरी, शिवछत्रपती विद्यालय आळेफाटा, रे. बा. देवकर विद्यालय वडगाव आनंद, श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेढार, ज्ञानराज स्कूल आळे, जे. आर. गुंजाळ स्कूल आळेफाटा येथील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.