हळदी
हळदी समारंभात नवरीपासून ते सर्वजण पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. मात्र तुम्हाला माहितीये का? हळदीला पिवळ्या रंगाचे कपडे का घालतात?
पिवळ्या रंगाचे महत्व
हळदीला पिवळा रंगच का निवडला जातो, यामागची नेमकी कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.
समृद्धीचे प्रतीक
हिंदू धर्मात पिवळा रंग हा शुद्धता, मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग भगवान विष्णू आणि गणपतीला प्रिय आहे.
रंगाचे महत्व
हळदीच्या समारंभात वधू-वरांना हळद लावली जाते. जर आपण दुसऱ्या रंगाचे कपडे घातले, तर हळदीचे डाग त्यावर उठून दिसतात आणि कपडे खराब होतात. पिवळ्या कपड्यांवर हळदीचे डाग मिसळून जातात, त्यामुळे हा रंग निवडतात.
नवीन आयुष्याची सुरूवात
लग्नानंतर वधू-वर नवीन आयुष्याची सुरुवात करत असतात, त्यामुळे हा रंग त्यांच्या आयुष्यात आनंद आणि नवी ऊर्जा घेऊन येतो, अशी श्रद्धा आहे.
शास्त्रीय कारण
पिवळा रंग सूर्याच्या प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो. पूर्वीच्या काळी लग्नाचे विधी घराच्या अंगणात किंवा मोकळ्या जागेत व्हायचे. पिवळ्या रंगाचे कपडे घातल्यामुळे सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर परावर्तित होतो, ज्यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नैसर्गिक चमक येते.

लेटेस्ट पॅटर्न
हळदीच्या कार्यक्रमात पिवळ्या रंगाची साडी नेसणं हे केवळ पारंपारिकच नाही, तर फोटोंमध्येही खूप सुंदर दिसतं. तुम्ही लेटेस्ट पॅटर्नमधील साडीप्रकार निवडू शकता.

subsequent: Eye Yoga Exercise: चष्मा कधीच लागणार नाही, घरीच करा हे 5 योगा
येथे क्लिक करा…