विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवावा जयश्री गुदगे : मायणीत

दहावीतील विद्यार्थ्यांकडून
मायणी विद्यालयास भेटवस्तू

कलेढोण, ता. २० : वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी १६ हजार ५०० रुपयांचे दोन साऊंड बॉक्स व भारतमाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी २५ हजारांची लोखंडी दोन कपाटे व माईक सिस्टिम भेट दिली.
शाळेच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या संयुक्त शुभचिंतन समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका जयश्री गुदगे उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे संचालक अरविंद पुस्तके, एन. व्ही. कुबेर, डी. आर. पिटके, व्ही. एम. देशमुख, बाळासाहेब पोरे, शशिकांत खैरमोडे, मुख्याध्यापिका वर्षा येवले, मुख्याध्यापिका सुनीता बागडे, उपमुख्याध्यापक महेश तांबवेकर, पर्यवेक्षक सुभाष बागडे, प्रकाश शिंदे, पर्यवेक्षक बाळकृष्ण गुरव, प्रकाश सुरमुख आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक शशिकांत खैरमोडे यांनी प्रास्ताविक केले. सुभाष माळी यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा येवले यांनी आभार मानले.

00531
मायणी : विद्यालयास भेटवस्तू प्रदान करताना विद्यार्थी- विद्यार्थिनी व मान्यवर. (अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)
…………………….

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart