डोळ्यांचा त्रास
आजकाल सतत स्क्रिनवर काम केल्यानंतर , मोबाई फोन पाहिल्यानंतर डोळ्यांच्या त्रास होतो आहे.
दृष्टी सुधारण्यासाठी योगा
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि चष्मा लागू नये म्हणून तुम्ही घरच्या घरी सोपे योगा प्रकार करू शकता.
त्राटक क्रिया
अंधाऱ्या खोलीत डोळ्यांच्या समोर एक मेणबत्ती किंवा दिवा लावा. डोळे न मिटता त्या ज्योतीकडे एकटक पाहत राहा. जेव्हा डोळ्यांतून पाणी येईल, तेव्हा डोळे मिटून घ्या आणि शांत बसा.
पामिंग
दोन्ही तळहात एकमेकांवर वेगाने घासा, जोपर्यंत ते गरम होत नाहीत तो पर्यंत घासत राहा नंतर उबदार हात डोळ्यांवर अलगत ठेवा. दोन्ही तळहात एकमेकांवर वेगाने घासा, जोपर्यंत ते गरम होत नाहीत.
आय रोटेशन
डोके स्थिर ठेवून डोळे वर-खाली, डावीकडे-उजवीकडे आणि नंतर गोल फिरवा. यामुळे डोळ्यांची लवचिकता वाढते आणि चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.

अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा
आपला उजवा हात समोर सरळ करा आणि अंगठा वरच्या दिशेला ठेवा. अंगठ्याच्या नखावर लक्ष केंद्रित करा. आता अंगठा हळूहळू नाकाजवळ आणा आणि पुन्हा दूर न्या. तुमचे लक्ष सतत अंगठ्यावर असावे.
सर्वंगासना योगा
जमिनीवर झोपून पाय आणि कंबर हळूहळू वर उचला. शरीराचा भार खांद्यांवर असावा आणि पाय सरळ आकाशाकडे असावेत.

subsequent: Black Elbow Tips: हातांच्या कोपरांचा काळेपणा कसा घालवायचा?
येथे क्लिक करा..