
प्रतिनिधी | अमरावती पुणे-मुंबईसारख्या महानगरांशी तुलना करता आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि कल्पकतेची अजिबात कमतरता नाही. येणारा काळ हा संशोधनाचा असून विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता आपल्या संशोधनातून स्वतःचे ‘स्टार्टअप’ उभे करावे आणि ‘जॉब सीकर’ नोकरी मागणारे होण्यापेक्षा ‘जॉब गिव्हर’ नोकरी देणारे बनावे, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठाच्या वतीने आविष्कार स्पर्धत राज्यातून तिसरे स्थान मिळवल्याबद्दल सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख अधिसभा सभागृह येथे सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे उपस्थित होते. यावेळी कुलगुरूंनी सर्वप्रथम राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कुलगुरू पुढे म्हणाले, अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी, विशेषत: ग्रामीण भागातील मुले नाविन्यपूर्ण संशोधनात आघाडीवर आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील अजिंक्य पोटे या विद्यार्थ्याने अन्वेषण स्पर्धेत थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून यश मिळविले. यावरून हे सिध्द होते की, आपल्या विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन” जागतिक दर्जाचे आहे. आविष्कार स्पर्धत आज मिळालेले यश हा शेवट नसून, हे तुमच्या कारकीर्दीचे पहिले पाऊल” आहे. असे समजून जिद्दीने पुढे वाटचाल करा, असा मोलाचा सल्ला कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी अजिंक्य पोटे, रोहिणी कांबे, प्रिया जंजाळकर, सौरभ श्रीराव, रोहण बुंदेले, राजीवकुमार जीवतानी, श्रावणी ठाकरे, रेणुका येंडे या विद्यार्थ्यांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार झाला. तसेच आविष्कार सेलचे अध्यक्ष डॉ. अजय लाड, आविष्कार सेल समन्वयक डॉ. मनिषा कोडापे, व्यवस्थापक डॉ. निरज घनवटे, डॉ. राजेश भोयर, डॉ. जयंत वडतकर तसेच शाहु महाविद्यालयाचे डॉ. शिरिष जैन व डॉ. प्रकाश केंद्रे, डॉ. तिडके यांचाही त्यांनी सत्कार केला. सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्तविक भाषणातून आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांनी आविष्कार स्पर्धेसाठी विद्याथ्र्यांकडून करून घेतलेली तयारी, स्पर्धेचे नियोजन आदीविषयी माहिती दिली. संचालन करत आभार खुशबु जयस्वाल हिने मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर तसेच शिक्षक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिनिधी | अमरावती चौथ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत २८ ते ३५ या वयोगटात अचलपूर येथील कपिल अवस्थी यांनी सवुर्ण पदक प्राप्त केले आहे. ही स्पर्धा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाच्या योग विभाग व बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत चारशेपेक्षा अधिक योगपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ६ ते ५५ वयोगटातील स्पर्धकांचा सहभाग होता. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला डिसीपीई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक म्हणून पत्रकार वैभव चिंचाळकर, कृष्णा लोखंडे यांच्यासह माजी प्राचार्य व वरिष्ठ योगगुरू डॉ. अरुण खोडस्कर, योग विभागाचे प्रमुख डॉ. सुनील लाबडे, ज्येष्ठ योगपटू आनंद हिवराळे, नितिन काळे, डॉ. वशिष्ट खोडस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगगुरू डॉ. अरूण खोडस्कर यांनी केले. संचालन डॉ. अर्चना देशपांडे तर आभार प्रा. सुष्मा शिरभाते यांनी मानले. समारोपिय सत्रांमध्ये व्यासपीठावर प्राध्यापिका अर्चना देशपांडे, राष्ट्रीय योग प्रशिक्षक व परीक्षक स्वाती गडेकर, अमरावती बृहन महाराष्ट्र परिषदेच्या उपाध्यक्ष गायधनी, डॉ. विशाल खोडस्कर, प्रा. प्रतीक पात्रे, प्रा. प्रणय पवार उपस्थित होते. चौथ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत अचलपूर येथील बुंदेलपुरा निवासी कपिल अशोक अवस्थी यांनी २८ ते ३५ या वयोगटात चमकदार कामगिरी बजावत सुवर्ण पदक प्राप्त केले. या बद्दल कपिल अवस्थी यांचे सर्वेत्र अभिनंदन होत आहे. कपिल अवस्थी यांनी यापुर्वी २९ जून २०२५ मध्ये राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये कास्यपदक प्राप्त केले होते आणि आता राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवून भारताचे प्रतिनिधित्व आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा कपिल यांनी व्यक्त केली आहे. कपिल यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील गुरुजन मार्गदर्शक व सर्व सहकारी, संस्थेला दिले आहे. स्टार्टअप्ससाठी विद्यापीठाचा ४५ स्टार्टअप्स नोंदणीकृत बदलत्या काळाचा वेध घेताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चे उदाहरण दिले. ते म्हणाले, आज एआयमुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात क्रांती होत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे व्यापारीकरण करणे काळाची गरज आहे. आपल्या विद्यापीठातही इन्क्युबेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सीड फंड दिला जातो. सध्या ४५ स्टार्टअप्स आपल्याकडे नोंदणीकृत आहेत, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.