पुरुषांमध्ये निरवार भलावी यांचा, महिलांमध्ये रितू तलमलेंचा डंका:मुख्य १० कि.मी.शर्यतीत मिळवले यश, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाद्वारे शिवजयंतीनिमित्त आयोजन‎

पुरुषांमध्ये निरवार भलावी यांचा, महिलांमध्ये रितू तलमलेंचा डंका:मुख्य १० कि.मी.शर्यतीत मिळवले यश, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाद्वारे शिवजयंतीनिमित्त आयोजन‎
प्रतिनिधी | अमरावती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त गुरुवार १९ रोजी पहाटे ६ वाजता आयोजित करण्यात आलेली शिवदौड मॅरेथॉन स्पर्धा उत्साह व शिस्तीत झाली. शेकडो खेळाडूंनी या शिवदौडमध्ये सहभाग नोंदवला. पुरुषांच्या १० कि.मी.खुल्या गटात निरवार भलावीने सर्वोत्तम तर महिलांच्या १० कि.मी. खुल्या गटात रितू तलमलेने उत्कृष्ट वेळेची नोंद करून विजेतेपद पटकावले. शिवदौडीचे उद्घाटन पहाटे ६ वाजता कार्यक्रमाध्यक्ष व स्वागताध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, उद्घाटक कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते, विशेष अतिथी महापौर श्रीचंद तेजवानी,प्रमुख अतिथी सुभाष बनसोड कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ. अशोक घोगरे, डॉ.विधळे, डॉ.पेंढारकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. या स्पर्धेमध्ये १९ वर्षांआतील मुले व मुली, १४ वर्षांआतील मुले व मुली, तसेच ४५ वर्षांवरील पुरुष व ४० वर्षांवरील महिला यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी विविध गटानुसार अंतर निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये १० किलोमीटर, ५ किलोमीटर व ३ किलोमीटर अशा अंतरांचा समावेश होता. स्पर्धकांनी अत्यंत उत्साहाने व जिद्दीने स्पर्धा पूर्ण केली.स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ सकाळी ८ वाजता पार पडला. या समारंभाला समारंभाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य हेमंत काळमेघ, विभागीय कार्यालय महसूल अतिरिक्त आयुक्त सुरज वाघमारे,दिलीप पाटील अध्यक्ष, अमरावती मॅरेथॉन ट्रस्ट,प्रा.प्रकाश देशमुख मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरणामध्ये प्रत्येक गटामधील प्रथम ते सहाव्या क्रमांकापर्यंत येणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम स्थान कपिल हटकर, द्वितीय सुमित चव्हाण, तृतीय रोशन ठाकरे, चतुर्थ ओमकार खराते, पाचवे सोहम जाधव, सहावे स्थान हिमांशू नारखेडेने पटकावले. मुलींच्या गटात प्रथम क्रमांक अनन्या नांगरकर, द्वितीय राजलक्ष्मी मोहळे, तृतीय पूर्वी सावळकर, चौथा यशश्री भोयर पाचवा शर्वरी देवकर, सहावा क्रमांक जान्हवी तिवारी यांनी पटकावला. त्यानंतर १९ वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तन्मय मांडवकर, द्वितीय क्रमांक अभय इंगळे, तृतीय क्रमांक अरबाज खान, चौथा क्रमांक लकी समर्थ, पाचवा क्रमांक ओम वाडेकर, सहावा क्रमांक सार्थक गिरेने मिळवला. मुलीमध्ये प्रथम स्थानी श्रुतिका नंदेवार, द्वितीय स्थानी स्नेहा चौधरी, तृतीय स्थानी श्रावणी खोब्रागडे, चौथ्या स्थानी तनिबा चिंचमलकर, पाचव्या स्थानी आकांक्षा गायकवाड सहाव्या स्थानी नैना लांजेवार राहिली. ४५ वर्षांवरील पुरुष धावकांमध्ये प्रथम क्रमांक प्रमोद उरकुडे, द्वितीय सुभाष चिमणकर, तृतीय राजेश कुचे, चौथे नरेंद्र लाबकने, पाचवे नागोराव भोयर तर सहावे स्थान अविनाश राजगुरे यांनी मिळवले. त्याचप्रमाणे ४० वर्षांवरील महिलामध्ये प्रथम क्रमांक माधुरी मांडळे, द्वितीय प्रतिभा लाबकाने, तृतीय शारदा भोयर, चौथे स्थान मीनाक्षी जायले, पाचवा क्रमांक कविता आडे व सहावे स्थान शारदा नरोडे यांनी पटकावले.पुरुषांच्या १० कि.मी. शर्यतीत प्रथम क्रमांक निरवार भलावी, द्वितीय क्रमांक गौरव खोडतकर, तृतीय क्रमांक करण चव्हाण, चौथा क्रमांक भावेश खंडार, पाचवा क्रमांक खुमानसिंग ठाकरे, सहावा क्रमांक शंकर नांदे यांनी मिळवला. त्यानंतर महिलांच्या १० कि.मी. मध्ये प्रथम क्रमांक रितू तलमले, द्वितीय क्रमांक अस्मिता सोनी, तृतीय क्रमांक डॉ. ऋतुजा फुके(वैद्य ), चौथा क्रमांक रुही पिंजानी, पाचवा क्रमांक रिहा नरसू व सहावा क्रमांक शितल श्रावगी यांनी पटकावला. त्यानंतर महिलांच्या खुल्या गटात प्रथम स्थान प्रणाली शेगोकार, द्वितीय क्रमांक अंजली मडावी, तृतीय स्थान प्रगती जाधव, चौथा क्रमांक पूजा पंचबुद्धे, पाचवा क्रमांक सलोनी लव्हाळे व सहावे स्थान स्नेहल चव्हाण यांनी मिळवले.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart