
प्रतिनिधी | अकोला महानगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीला गुरुवारी (दि.१९) सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी, झाँकीयुक्त वाहने, मुलींचे लेझीम पथक, वारकरी दिंडी व ढोल ताशांच्या गजरात प्रारंभ झालेली मिरवणूक गांधी मार्ग, सिटी कोतवाली, टिळक रोड, जुने कॉटन मार्केट, मानेक टॉकीज मार्गे शिवरायांच्या नामाचा जयघोष करत शिवाजी महाराज पार्क येथे आली. सर्वप्रथम मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या शिव पालखीचे आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, मनपा गटनेता पवन महल्ले, नगरसेवक हर्षल भांबरे, संतोष डोंगरे, आरती घोगलिया, अॅड. कल्पना गोटफोडे, निकिता देशमुख, किशोर मांगटे पाटील, कृष्ण शर्मा आदींनी पूजन केले. . यशस्वितेसाठी समितीचे पवन महल्ले, संजय गोटफोडे, निरंजन पावसाळे, राम बोंद्रे, अॅड. देवाशिष काकड, संदीप बाथो, राहुल लोहिया, सागर तिवारी, ऋषी जगताप, गणेश माने, ललित भंगाळे, गजू पाटील, अविनाश कानगुडे, हरीश जंगम, सनी मानकर, वैभव मोरे, अक्षय थोरात, शुभम गोतमारे, बाबू ठाकूर, पंकज मुराई, दुर्गेश पाटील, सूरज जगताप, प्रतीक खराटे, साहिल सप्रे, रोशन कसाब, रणजित खेडकर सहभागी होते.