क्रांती चौकात नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी:मिरवणुकीत पाच ते सहा ठिकाणी हाणामारी; 70 हून अधिक मोबाइल, 20 महिलांचे मंगळसूत्रेही लंपास

क्रांती चौकात नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी:मिरवणुकीत पाच ते सहा ठिकाणी हाणामारी; 70 हून अधिक मोबाइल, 20 महिलांचे मंगळसूत्रेही लंपास
शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, क्रांती चौक परिसरात रात्रीच्या सुमारास काही हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले असून, चाकू हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विटखेडा येथील रहिवासी शुभम दत्तात्रय गायकवाड (१८) आणि सिद्धांत कडूबा चव्हाण यांच्यावर अज्ञातांनी चाकूने वार केले. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केवळ नाचण्याच्या वादातून ही घटना घडली असून, रात्री उशिरापर्यंत शहरात इतर पाच ते सहा ठिकाणी किरकोळ हाणामारीच्या घटनांची नोंद झाली आहे. तर एका स्टेजवर घोषणा देताना दोन गट भिडल्याची घटना समोर आली होती. मिरवणुकीत चोरटे मोकाट ; ५ संशयित पोलिसांच्या ताब्यात मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ करून घेतला. क्रांती चौक परिसरातून तब्बल ७० ते ८० मोबाइल आणि महिलांच्या गळ्यातील २० मंगळसूत्रे लंपास करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दुचाकी, मंगळसूत्र आणि मोबाइल चोरीच्या संशयावरून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असूनही चोरांनी घातलेल्या धुमाकूळामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart