Thursday, February 26, 2026
HomeNewsMartahiहा कसला मुळशी पॅटर्न!'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा...

हा कसला मुळशी पॅटर्न!’सिकंदर शेख’वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO|Pune News Wrestler Sikandar Shaikh Attacked During Kushti Match in Mulshi video goes viral| Saam television News

Sikandar Shaikh AttackedSaam Tv

Priya More
Published On: 

Summary –

  • मुळशीतील पौड गावात कुस्ती स्पर्धेदरम्यान गोंधळ झाला

  • कुस्तीपटू सिकंदर शेखवर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न

  • समर्थक मैदानात घुसल्याने तणावाचे वातावरण

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

अक्षय बडवे, पुणे

मुळशीत कुस्तीला गालबोट लागल्याची घटना घडली. सिकंदर शेखवर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या हल्ल्याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशीतल्या पौड गावात कुस्तीचा आखाडा रंगला होता. या आखाड्यात असं काही घडलंय की ज्याची आता संपूर्ण कुस्ती क्षेत्रात चर्चा सुरू झाली. महाराष्ट्र केसरी राहिलेल्या पैलवान सिकंदर शेखवर आखाड्यात हात उचलण्यात आला. त्याला चक्क मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव आणि मुळशीतील पौड गावात भरलेली भव्य कुस्ती स्पर्धा चांगलीच चर्चेत राहिली. या स्पर्धेत महाराष्ट्राचा आघाडीचा मल्ल सिकंदर शेख आणि तगडा प्रतिस्पर्धी माऊली कोकाटे यांच्यात तब्बल ११ लाखांची कुस्ती रंगली होती. कुस्तीचे पंच होते आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोहिदास आप्पा. तासभर दोन्ही मल्लांनी दमदार झुंज दिली पण निकाल लागत नव्हता. तर आयोजकांकडून कुस्ती निकाली लागल्याशिवाय थांबवली जाणार नाही अशा घोषणा केल्या जात होत्या.

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न!'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

Pune : पुणे हादरले! महिलेला जबरदस्ती रिक्षातून नेलं, सामूहिक बलात्कार केला अन्…

दरम्यान मानेवर मारण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही मल्लांमध्ये वाद निर्माण झाला. दोन्ही मल्लं आमने-सामने आले. इतक्यात मैदानाबाहेरून अचानक आलेल्या माऊली कोकाटेच्या समर्थकाने सिकंदर शेखला मारहाण केली. मारहाणीचा हा प्रकार कुस्ती पाहणाऱ्यांनी मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद केले आणि त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. शिट्ट्या…आरडाओरडा आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं.

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न!'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

Pune Tourism : मराठ्यांचा पराक्रम, शौर्य अन् स्वाभिमानाचे प्रतीक पुण्यातील ‘हा’ किल्ला; आजही जपतोय ऐतिहासिक वारसा

माऊली कोकाटेचे आणखी काही समर्थक सिकंदर शेखच्या अंगावर धावून गेले. त्याचाच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर आयोजकांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही मल्लांना विजयी घोषित केलं. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट उसळली. कुस्ती क्षेत्रामध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली.

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न!'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring