Home - Martahi - हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी नमुंमपा ने कंबर कसली
हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी नमुंमपा ने कंबर कसली
हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने कसली कंबर
चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश
वाशी, ता. १९ (बातमीदार) ः नवी मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने आता कंबर कसली आहे. यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना आखल्या असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिक कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सोमवारी (ता. १६) घेण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत दिले.
शहरात सध्या खासगी आणि सरकारी प्राधिकरणांमार्फत मिळून ७०० हून अधिक छोटी-मोठी बांधकामे सुरू आहेत. या सर्व साईट्सवर मानक कार्यप्रणालीचे पालन होतेय की नाही, याची विभाग अधिकारी स्तरावर चार दिवसांत पाहणी करून अहवाल सादर करण्याची मुदत दिली. तसेच, मानक कार्यप्रणालीचे पालन होत नसल्यास काम बंद करावे व त्यानंतरही सुधारणा न केल्यास बांधकाम परवानगी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, अशी नोटीस देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. आकाराने छोट्या-मोठ्या अशा सर्वच बांधकाम साईट्सवर हवा गुणवत्तादर्शक यंत्रे बसविणे व त्याचा तपशील अॅपवर इंटीग्रेटेड करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निेर्देश आयुक्तांनी दिले.
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();