पालघर दर्शनातून विद्यार्थ्यांना जिल्हा ओळख

जव्हार, ता. १९ (बातमीदार) : केवळ पाठ्यपुस्तकातील माहितीपुरती जिल्ह्याची ओळख न ठेवता प्रत्यक्ष स्थळदर्शनातून ज्ञान देण्याचा अभिनव उपक्रम विनवळ येथील जिल्हा परिषद शाळेने सोमवारी (ता. १६) राबविला. खेड्यातील विद्यार्थ्यांना पालघर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, उद्योग आणि प्रशासन रचना समजावी या उद्देशाने आयोजित शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पालघरमधील प्रसिद्ध महालक्ष्मी देवी मंदिर परिसरातील डोंगर चढत विद्यार्थ्यांनी स्थानिक भौगोलिक रचनेचा अनुभव घेत सहलीची सुरुवात केली. त्यानंतर डहाणू येथील समुद्रकिनारी भेट देत विद्यार्थ्यांना अरबी समुद्र याची ओळख करून देण्यात आली. अमावस्येच्या निमित्ताने भरती-ओहोटीची संकल्पना प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगण्यात आली. इतिहासाची सांगड घालत विद्यार्थ्यांनी तारापूर किल्ला येथील अवशेष व तटबंदीचे निरीक्षण केले. पोर्तुगीज सत्ताकाळातील वास्तूशैली आणि संरक्षण व्यवस्था याविषयी शिक्षकांनी माहिती दिली. पुढे बोईसर औद्योगिक वसाहतीला येथे भेट देत औद्योगिक विकासाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सहलीचा समारोप जे. एस. डब्ल्यू. समूहाने विकसित केलेल्या बोईसर येथील उद्यानात झाला. येथे विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळांचा आनंद घेतला. मुख्याध्यापक देवराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहलप्रमुख विजय रडे यांनी सहलीचे नियोजन केले. या वेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक व नागरिकशास्त्रीय माहिती देत सहल अभ्यासपूर्ण केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
———-
चौकट
जिल्हा प्रशासनाची कार्यपद्धती समजावी म्हणून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद कार्यालयात नेण्यात आले. कृषी, बांधकाम, वित्त, आरोग्य, शिक्षण व महिला-बालकल्याण अशा विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देत कामकाजाची माहिती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन दाखवून विद्यार्थ्यांना प्रशासकीय रचनेची ओळख करून देण्यात आली. आधुनिक इमारतीतील लिफ्टचा अनुभवही विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart