डिंगोरेमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केल्या कला

ओतूर, ता. १९ : डिंगोरे (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती मूर्तीचे पूजन आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद माळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यालयातील शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती घेण्यात आली. त्यामुळे परिसरातील वातावरण शिवमय झाले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारीत पोवाडे सादर केले. तर विद्यार्थिनींनी छत्रपती शिवरायांच्या जन्माचा पाळणा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाषणाद्वारे छत्रपती शिवरायांचा जीवनपरिचय व त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग प्रभावीपणे मांडले.
इयत्ता सातवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांवरील विविध गीतांवर नृत्ये सादर केली. विद्यार्थ्यांनी मावळे, छत्रपती शिवराय, जिजाऊ यांच्या वेशभूषा केल्या होत्या. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख मंगेश कोंढार यांनी केले. शिक्षिका साधना तांबे, दीपा सावंत, अनुराधा नरवडे, दत्तात्रेय घोलप, वैभव देशमुख, रतिलाल बागुल, मंगेश डुंबरे, दिनेश पाटील व शिवाजी उकिरडे यांनी केले.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart