ढेबेवाडी श्री वाल्मिकी यात्रेकरूंवर भारुडाचे गारूड

श्री वाल्मीकी यात्रेकरूंवर भारुडाचे ‘गारुड’

भाविकांना प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी; विविध जिल्ह्यांतून ओघ

ढेबेवाडी, ता. १९ : श्री क्षेत्र वाल्मीक (पाणेरी, ता. पाटण) येथे श्री वाल्मीकी यात्रा भक्तिमय वातावरणात उत्साहात झाली. विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे जंगलात जणू भक्तीचा सागरच अवतरल्याचा भास झाला. भारुड, भजन आदी प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी यानिमित्ताने भाविकांना मिळाली. सुप्रसिद्ध भारुडकार चंद्रकांत बर्गे महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भारुडाने तर उपस्थितांवर गारुडच घातल्याचे बघायला मिळाले.

प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी यात्रा साजरी करण्याची श्री क्षेत्र वाल्मीक येथील पुरातन परंपरा आहे. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळपासूनच त्या मार्गावर भाविकांची वर्दळ होती. एसटीसह टेंपो, ट्रॅक्टर, जीप, दुचाकीसह डोंगरातून पायपीट करतही भाविक श्री वाल्मीकी मंदिराकडे दाखल होत होते. मंदिर परिसरात दूरवर भाविकांच्या दर्शन रांगा लागलेल्या होत्या. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. यात्रा परिसरात मेवा-मिठाई, खेळणी आदी दुकानांची रेलचेल होती. वाल्मीकीकडे जाणारे चेकनाके गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी वन्यजीव विभागाने खुले ठेवले होते. यात्रेत प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन असते. निमसोड येथून आलेल्या श्री माऊली प्रासादिक भजनी मंडळाच्या पायी दिंडीमार्फतही विविध कार्यक्रम झाले.
आदर्शगाव चिंचणेर (निंब- सातारा) येथील श्री भैरवनाथ कला गुणदर्शन भजनी मंडळाचे सुप्रसिद्ध भारुडकार चंद्रकांत बर्गे महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भारुडाने उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळपर्यंत यात्रास्थळी भाविकांचा ओघ टिकूनच होता. पाणेरीचे सरपंच शिवाजी पवार, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित हाेते.
——–
(चौकट

———-
फराळ वाटप
श्री वाल्मीक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सेवाभावी संस्था, व्यक्ती आदींच्या माध्यमातून फराळाचे वाटप करण्यात येते. यंदा नूतन जिल्हा परिषद सदस्या मृणाल महेश पाटील यांच्यासह अन्य काहींनी मंदिर परिसर व यात्रेत फराळाचे वाटप केले. साबुदाणा खिचडी, केळी आदींचे वाटप भाविकांना केले.
———————-

B08127
श्री क्षेत्र वाल्मीक : यात्रेकरू भाविकांसमोर भारुड सादर करताना हभप चंद्रकांत बर्गे व सहकारी.
————————-

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart