MDH26B05139
माढा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शंभू साठे मित्र परिवाराने काढलेल्या बाईक रॅलीत सहभागी युवक.
—
माढ्यात शिवकालीन क्रीडा स्पर्धा
माढा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती माढा शहरात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. संग्राम मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवाजी महाराज चौकात प्रतिमेचे पूजन करून शालेय विद्यार्थ्यांच्या शिवकालीन क्रीडा स्पर्धा, प्रेरणागीते व लेझीम सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, प्रा. शिवाजीराव सावंत, नगराध्यक्षा मीनल साठे, पृथ्वीराज सावंत, चंद्रशेखर गोटे, डॉ. सुभाष पाटील आदी उपस्थित होते. बाबा मस्के व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
शंभू साठे मित्र परिवाराने शहरातून बाईक रॅली काढून शिवजयंती साजरी केली. अजिंक्यतारा मंडळ, तांबे चौक, साठे गल्ली तसेच सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेतही प्रतिमापूजन करण्यात आले. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.