वडगावमध्ये ‘बुलेट राजां’वर कारवाई

वडगाव मावळ, ता. १९ : शहरात वाहनांचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ‘बुलेट राजां’वर तसेच यामाहा, स्प्लेंडर आदी दुचाकी चालवणाऱ्या रोडरोमिओंवर वडगाव मावळ पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.
पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, सहायक निरीक्षक शीतलकुमार डोईजड, हवालदार श्रीशैल कंटोळी, संदीप चौधरी, सचिन देशमुख, चेतन कुंभार, गणेश होळकर यांनी ही कारवाई केली.
शहरातील मुख्य बाजारपेठ रोड, न्यू इंग्लिश स्कूल परिसर, रमेश कुमार सहानी स्कूल परिसर, माळीनगर, केशवनगर आदी ठिकाणी बुलेट, स्प्लेंडर, यामाहा या गाड्यांचे सायलेन्सर बदलून त्यांचा कर्णकर्कश आवाज करत जाणारे विद्यार्थी व इतर वाहनचालकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामध्ये आठ बुलेटचालक, चार यामाहा चालक, तीन स्प्लेंडर चालकांवर कारवाई करण्यात आली असून, गाड्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. वाहनांमधील सायलेन्सर बदलून ती जोरात चालवल्याने कर्णकर्कश आवाजाने वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने यापुढेही ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

function fbPixel () { if (fired) return; fired = true;

!function(f,b,e,v,n,t,s){ if(f.fbq) return; n=f.fbq=function(){ n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments) }; if(!f._fbq) f._fbq=n; n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0'; n.queue=[]; t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v; s=b.getElementsByTagName(e)[0]; s.parentNode.insertBefore(t,s); }(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');

fbq('init', '131893666558789'); fbq('track', 'PageView'); }

function trigger() { fbPixel(); cleanup(); }

function cleanup() { window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.removeEventListener('keydown', trigger); }

var passiveOpts = { passive: true, once: true };

// fire on first meaningful interaction window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts); window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts); window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts); window.addEventListener('keydown', trigger, { once: true });

// safety fallback (user never interacts) setTimeout(fbPixel, 15000); })();

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart