SPPU Shivaji Maharaj Jayanti Celebration; VC Suresh Gosavi & Pro-VC Parag Kalkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक

.

जयकर ज्ञानस्रोत केंद्रातील ग्रंथालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ जिजाऊ यांचा पोशाख परिधान करून महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत ढोल पथकासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर यांनी विद्यापीठाच्या वतीने पुष्पहार अर्पण केला. तसेच, विविध शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनीही महाराजांना अभिवादन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि अॅड. रवींद्र यादव यांचे व्याख्यान यांचा समावेश होता.

या तीन दिवसीय उत्सवात दीपोत्सव, पोवाडा आणि लोकवाद्य वृंद यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट सादरीकरण आणि मर्दानी खेळ यांसारख्या स्पर्धा व उपक्रमांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, अधिष्ठाता प्रा. विजय खरे, प्रभारी कुलसचिव तथा वित्त व लेखा अधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. प्रभाकर देसाई, अधिसभा सदस्य सचिन गोर्डे, कृष्णा भंडलकर, डॉ. राजेंद्र घोडे, सुमित ढोरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. सविता कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. गणेश भामे, संचालक व विभागप्रमुख प्रा. (डॉ.) विलास आढाव, संचालक जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र डॉ. संजय देसले, अध्यासन प्रमुख बोकेफोडे आदी मान्यवरांनी महाराजांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमास शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, विविध विद्यार्थी व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SPPU Shivaji Maharaj Jayanti Celebration; VC Suresh Gosavi & Pro-VC Parag Kalkar

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart