Thursday, February 26, 2026
HomeNewsMartahiराज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे...; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले?...

राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे…; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले? VIDEO

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यासाठी कालपासूनच शिवप्रेमी दाखल झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे आजचे राज्यकर्ते आहे का? यांना रट्टे दिले पाहिजे. सरकारकडून अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा झाला नाही, आणि इथे येऊन आरती करतात. राज्यातला शेतकरी फाशी घ्यायला लागला आहे. यांच्याकडून कर्जमाफी होत नाहीये. पण एक दिवस गोरगरीब जनतेचा चांगला दिवस उगणार म्हणजे उगणार असा विश्वास त्यांनी व्यक्त करत सरकारकडून कुठलीही अपेक्षा नाहीये असे म्हणाले. तसेच राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे दिले पाहिजे आणि गोट्याने हाणले पाहिजे असा जोरदार प्रहार जरांगे पाटील यांनी सरकारवर केला.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring