POT26B02166
पोथरे (ता. करमाळा) : शिवरायांच्या पालखी मिरवणुकीत सहभागी महिला.
—
पोथरेत पालखी मिरवणूक
पोथरे : करमाळा तालुक्यातील पोथरे येथे शिवजयंती पालखी मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली. यानंतर फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती मांडून ग्रामफेरी काढण्यात आली. या मिरवणुकीत मुलांसह महिलांनी पारंपरिक पोषाख परिधान केला होता. भगवे झेंडे, सहभागींना फेटे बांधण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने रस्त्यावर सडा टाकून रांगोळी काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी महाराजांच्या पालखीचे स्वागत करून फुलांची उधळण करण्यात आली. महिला व मुली पालखी आपल्या खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या. यावेळी शिवजयंती उत्सव समितीसह श्यामल झिंजाडे, उषा झिंजाडे, शोभा पुराणे, जया झिंजाडे, मनीषा झिंजाडे, रेखा झिंजाडे, राणी झिंजाडे, सोनाली पुराणे, श्रुती वडेकर, सानिका नंदरगे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांना फळे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.