Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात तर काही व्हिडीओ हे काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये पाहता पाहता एका खाजगी बसला आग लागल्याचं दिसतंय.

केरळ मधील ओट्टापालममध्ये धावत्या बसला आग आल लागलेल्या आगीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या घटनेत एका ऑनलाइन डिलिव्हरी एजंटने धाडस दाखवत बसचा अडकलेला दरवाजा तोडून प्रवाशांचे प्राण वाचवलेत. ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, पलक्कड–गुरुवायूर मार्गावर धावणाऱ्या बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धुराचं रूप आगीच्या ज्वाळांमध्ये बदललं. प्रसंगाची चाहूल लागताच चालकने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवलीय. मात्र पुढील ऑटोमॅटिक दरवाजा न उघडल्याने काही प्रवासी बसमध्ये अडकले होते.

View this submit on Instagram

A submit shared by Onmanorama (@onmanorama)

आग लागलेल्या बसचा मागील दरवाजा उघडल्यामुळे काही जणांना बाहेर पडणं शक्य झालं. परंतु पुढील भागात अडकलेल्या प्रवाशांसाठी परिस्थिती धोकादायक दिसत होती. याच वेळी त्या रस्त्यातून जात असलेल्या एका ऑनलाइन डिलिव्हरी एजंटने धाडस दाखवत बसकडे धाव घेतली.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तरुण पुढील दरवाजावर जोरदार लाथ मारून दरवाजा तोडताना दिसतोय. दरवाजा उघडल्यानंतर अडकलेले प्रवासी तत्काळ बाहेर पडताना पाहायला मिळतंय.

दरम्यान, जवळील बसस्थानकावर उपस्थित ऑटोचालक आणि काही लोकांनी तत्परता दाखवत अग्निशमन दलालाल बोलावलं. यानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, बसच्या डिझेल पाइपमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी डिलीव्हरी बॉयचं कौतुक केलंय. एका युजरने म्हटलंय, ‘योग्य वेळी दाखवलेलं धाडस अनेकांचे प्राण वाचवू शकतं’ तर दुसऱ्याने लिहिलंय की, असे प्रकार घडू नयेत म्हणून दक्षता घेणं गरजेचं आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart