Home - Martahi - जिल्ह्यातील ६४ गुणवंत विद्यार्थी केरळ, तामिळनाडूला
जिल्ह्यातील ६४ गुणवंत विद्यार्थी केरळ, तामिळनाडूला
गुणवंतांचा केरळ, तामिळनाडू दौरा
समग्र शिक्षा अभियान ; शैक्षणिक प्रगतीनुसार निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः जिल्हा परिषद रत्नागिरी आणि ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘एक्स्पोजर व्हिजिट आउटसाइड स्टेट’ हा विशेष अभ्यासदौरा मंगळवारपासून उत्साहात सुरू झाला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील जिल्हा परिषद शाळांमधून निवडलेले एकूण ६४ प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी आज दक्षिण भारताच्या दिशेने रवाना झाले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि त्यांना बाहेरील राज्यांतील संस्कृती, इतिहास तसेच आधुनिक विज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उदात्त उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा दौरा १६ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानासह ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेता येणार आहे. या प्रवासात विद्यार्थी केरळमधील तिरूअनंतपुरम येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ (ISRO) या जगप्रसिद्ध अंतराळ केंद्राला भेट देणार आहेत. त्याचबरोबर राजा रविवर्मा आर्ट गॅलरी आणि ऐतिहासिक पद्मनाभ स्वामी मंदिर पाहण्याची संधीही त्यांना मिळणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारक, गांधी मंडपम आणि त्रिवेणी संगमाचा परिसर विद्यार्थी अनुभवणार आहेत.
—
function fbPixel () {
if (fired) return;
fired = true;
!function(f,b,e,v,n,t,s){
if(f.fbq) return;
n=f.fbq=function(){
n.callMethod ? n.callMethod.apply(n,arguments) : n.queue.push(arguments)
};
if(!f._fbq) f._fbq=n;
n.push=n; n.loaded=!0; n.version='2.0';
n.queue=[];
t=b.createElement(e); t.async=!0; t.src=v;
s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s);
}(window, document,'script','https://connect.facebook.net/en_US/fbevents.js');
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
function trigger() {
fbPixel();
cleanup();
}
function cleanup() {
window.removeEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.removeEventListener('keydown', trigger);
}
var passiveOpts = { passive: true, once: true };
// fire on first meaningful interaction
window.addEventListener('scroll', trigger, passiveOpts);
window.addEventListener('pointerdown', trigger, passiveOpts);
window.addEventListener('touchstart', trigger, passiveOpts);
window.addEventListener('keydown', trigger, { once: true });
// safety fallback (user never interacts)
setTimeout(fbPixel, 15000);
})();